आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबाद: कार-टँकर अपघातात आंध्र प्रदेशचे 3 जखमी, म्हैसमाळच्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद  - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वेरूळ गावापासून काही अंतरावर टँकर व  कार यांच्यात झालेल्या धडकेत तीन पर्यटकांसह कारचालक जखमी झाला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात झाला, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवार, दि. ६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वेरूळ बायपासवर घडली.   

विशाखापट्टणम,  विजयनगर येथील रहिवासी किरणकुमार कुटुरंगराव लाडे (३९), पतनुरू रविकुमार वासुदेवराव (३५), पी. संतोषकुमारी (३२), पिदेवेशू    (६), पिबेदोशू (४), एलकीर्थन (९) हे शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव दर्शन व जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी  कार (एमएच १७ बीडी ३३६८) भाड्याने घेऊन येत होते. 
त्या वेळी वेरूळजवळ  आले असता एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून भरधाव येणारा पेट्रोल टँकर (एमएच २० सीटी ८८८७) व ओव्हरटेक करणाऱ्या कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कारचालक पद्मनाथ दत्तात्रय लोखंडे (४४, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) यांच्यासह तीन पर्यटक जखमी झाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, म्हैसमाळच्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...