आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइट डेव्हलपमेंट शिक्षणाने विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात अालेल्या जावा लँग्वेज, सीएस स्क्रिप्ट यासह अाॅनलाईन किंग सुविधा नागरिकांना मिळवून देण्यासाठी वेबसाईट डेव्हलपमेंन्ट शिक्षणातून करिअर घडवावे, असे प्रतिपादन प्राचार्य डी.जी. निकाळजे यांनी केले.

शहरातील तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयामध्ये दिल्ली येथील सायबर ट्राेन टेक्नाॅलाॅजी यांच्या माध्यमातून वेबसाईड डेव्हलपमेंन्ट या विषयावर मंगळवार बुधवार (दि. १३ १४) राेजी दाेन दिवशीय कार्यशाळा घेण्यात अाली, यावेळी ते बाेलत हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक चंद्रमाेहन जंतवाल उपस्थित हाेते.

प्राचार्य निकाळजे म्हणाले, साेशल नेटवर्किंगच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी स्मार्टफाेन, संगनकाच्या सानिध्यात वावरत अाहेत. सध्याच्या िडजीटल तंत्रज्ञनाच्या युगामध्ये सर्व व्यवहार अाॅनलाईन झालेले असून भारत सरकारकडून कॅशलेस व्यवहार करण्याचे धाेरण जािहर केलेले अाहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तंत्र िशक्षण घेऊन अाॅनलाईन वेबसाईट तयार करणे तसेच अन्य कंपन्यांमध्ये नाेकरीच्या संधी उपलब्ध अाहेत. यावेळी सायबर ट्राेन कंपनीचे मार्गदर्शक चंद्रमाेहन जंतवाल यांनी वेब डेव्हल्पर, सायबर ड्राेन नेटवर्क साेल्युशनसह अन्य विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. कार्यशाळेचे प्रास्तावीक अाभार प्रा. अंकुश सुर्वे यांनी मानले.
बातम्या आणखी आहेत...