आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२.५ लाखांवर जमा रकमेची चौकशी होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर म्हणजे आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेनंतर ज्यांच्या बँक खात्यांवर अडीच लाखांपेक्षा एक रुपयाही अधिक जमा झाला, अशा सर्व खातेदारांची आयकर विभागातर्फे एक जानेवारीनंतर चौकशी केली जाणार आहे. मात्र, या मोहिमेमुळे प्रामाणिक खातेदारांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आयकर अधिकाऱ्यांनी सांिगतले.
नोटबंदीचा निर्णय होताच अनेकांनी काळे धन पांढरे करून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेतली. काही जणांनी सोने-चांदीची खरेदी केली. त्यावर आयकर विभाग नेमके काय काम करतो आहे याची उत्सुकता अणि धास्तीही आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, १० नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व आयकर आयुक्तांची दिल्लीत बैठक झाली. त्यात कारवाईची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत औरंगाबाद शहरातून किती रकमेचे सोने, चांदी आणि इतर महागड्या वस्तूंची खरेदी झाली. त्याचा तपशील बारकाईने मिळवण्याचे काम वेगात सुरू झाले आहे.

सूत्रांनी सांगितले की, १० नोव्हेंबर रोजी बँकांचे कामकाज सुरू झाले. गेल्या काही वर्षांपासून जेमतेम एक - दोन हजार रुपयांचा व्यवहार असलेल्या अनेक खात्यांत पहिल्याच दिवशी मोठ्या रकमा जमा झाल्या आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ही रक्कम अडीच लाखांपर्यंत असेल तर त्याची कोणतीही चौकशी होणार नाही. मात्र, अडीच लाखांपेक्षा एक रुपयाही अधिक जमा असेल तर तो व्यवहार आयकर विभागाच्या दृष्टीने संशयास्पद आहे. त्यामुळे जुना नोटा जमा करण्याची मुदत संपल्यावर म्हणजे एक जानेवारीपासून अशा खातेदारांची चौकशी होणार आहे. त्यांना प्रथम नोटिसा पाठवल्या जातील. त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पुढील कारवाई होईल. सध्या अनेक खात्यांचे नोव्हेंबर त्यापूर्वीचे रेकॉर्ड तपासणे सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बँकांचे व्यवहार सुरळीत, ५०० च्या नोटांची प्रतीक्षा
एक जानेवारीनंतर आयकर विभागाची मोहीम; प्रामाणिक खातेदारांनी घाबरण्याची गरज नाही
नोटाबंदीनंतर १५ व्या दिवशी शहरातील बँकांचे व्यवहार सुरळीत झाले आहेत. बँकेतून दोन हजारांच्या नोटा ग्राहकांना देण्यात येत असल्या तरी नागरिकांना मात्र ५०० च्या नोटांची प्रतीक्षा आहे. नोटाबंदीनंतर दोन आठवड्यांपासून बँकांमध्ये गर्दीचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गर्दी ओसरून व्यवहार सुरळीत होत आहेत. बँकांमध्ये सध्या दोन हजारांच्या नोटा अधिक आहेत. मात्र, नागरिकांकडून शंभर पाचशेच्या नोटांची मागणी होत आहे. बँकांकडे १०० च्या नोटांचा तुटवडा, तर ५०० च्या नोटा उपलब्ध झाल्या नाहीत. दोन दिवसांत या नोटा येण्याची शक्यता आहे. या नोटा मिळाल्यानंतर बाजारात चलनाचा तुटवड कमी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...