आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

*९९# च्या वापराने स्मार्टफोन, इंटरनेटविना कॅशलेस व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीला पन्नास दिवस उलटल्यानंतरही बँका, एटीएमचे व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. स्मार्ट फोन आणि इंटरनेट नसल्याने कॅशलेस व्यवहारात अडचणी येत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र, कॅशलेससाठी याची गरज नसून * ९९ # म्हणजेच यूएसएसडीच्या वापरानेही हे शक्य आहे. माहितीअभावी नागरिक याचा वापर करत नाही. जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी निवृत्त सरकारी अधिकारी चंद्रकांत वाजपेयी आणि त्यांची टीम गेल्या महिनाभरापासून परिश्रम घेत आहे. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि गावागावात प्रात्यक्षिक देऊन याबाबत प्रबोधन करत आहेत. 
 
नोटाबंदीनंतर काही नागरिक कॅशलेस व्यवहाराकडे वळले असले तरी यात प्रमुख अडचण स्मार्ट फोन नसण्याची आहे. स्मार्ट फोन नसल्यामुळे इंटरनेट नाही. परिणामी बँकांच्या वेबसाइट, विविध अॅप उघडता येत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आधीच अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा म्हणजेच यूएसएसडी सुविधेद्वारे कॅशलेस व्यवहार करण्याची तरतूद करून ठेवली आहे. यात जीएसएम फोनद्वारे विविध क्विक कोडचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रांतील सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी संवाद साधता येतो. यात बँकिंग सेवेचा समावेश असून पैसे प्रदान करणे, ट्रान्सफर करणे, बिल अदा करणे, बॅलन्स, मिनी बॅलन्स तपासणे आदी शक्य आहे. इंटरनेट सुविधेवर करता येणारे सर्वच व्यवहार यूएसएसडीद्वारे करता येतात. विशेष म्हणजे ही सुविधा वेगवेगळ्या भाषांत वापरता येते. 

मराठीसाठी *९९*२८# डायल करावे लागते. ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत वाजपेयी या योजनेच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. 

यांचीमिळत आहे साथ 
हाउपक्रम राबवण्यासाठी के. एस. भाले, गणेशलाल बाहेती, अशोक छाजेड, जयप्रकाश मुळे, डॉ. प्रवीण सोमय्या, दीपक वाडेकर, दिलीप थोरात, प्रवीण पाटील, मधुकर वाघ, एकनाथ जायभाये, तौफिक अहमद, अरुण फोके, राजेश कुलकर्णी, सुधाकर डुमणे, किशन मोरे, कासलीवाल, रायपूरकर, तरुण अभियंत्यांची संघटना इको विंग्ज यूथ फाउंडेशनचे आकाश शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे. 

बेसिकफोनवरही शक्य 
कॅशलेसव्यवहारासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट लागते, हा गैरसमज आहे. सरकारने कॅशलेसला प्रोत्साहन देतानाच त्यास पर्याय म्हणून यूएसएसडीची सुविधा दिली आहे. बेसिक फोनवरही याचा वापर शक्य आहे. फार कमी लोकांना याची माहिती असल्यामुळे आम्ही याचा प्रचार प्रसार करतोय. ही राष्ट्रसेवा आहे, असे चंद्रकांत वाजपेयी म्हणाले. 
 
बँकेचे नाव टाका 
-आयएफएससी कोडचे पहिले चार अंक टाका 
-बँकेच्या नावाची तीन अक्षरे टाका किंवा 
-बँकेचा अंकी न्यूमेरिक कोड टाका 
-यात उत्तर टाकताच पुढील मेनू खुला होतो. यात परत चार ऑप्शन येतात 
-अकाउंट बॅलन्स 
-मिनी स्टेटमेंट 
आयएफएससीद्वारे पैसे ट्रान्सफर करा 
एमएमआयडी दाखवा 
एमपिन बदला 
{फोनमध्ये *९९# असे टाइप करा. {लगेच हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचे ऑप्शन येईल. त्यापैकी एक भाषा निवडा {यावर चार ऑप्शन येतात. 

यूएसएसडीने व्यवहार करण्यासाठी सर्वात आधी बँकेत आपला मोबाइल क्रमांक रजिस्टर करावा लागतो. हे केल्यानंतर बँकांकडून मोबाइल मनी आयडेंटिफायर म्हणजेच एमएमआयडी दिला जातो. यासोबतच एक एमपिनही दिला जातो. त्यानंतर,असे करा यूएसएसडी व्यवहार 

गावागावात प्रचार 
चंद्रकांत वाजपेयी मध्य प्रदेशच्या ऊर्जा विभागात कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला समाजसेवेत व्यग्र ठेवले आहे. नोटाबंदीवर कॅशलेस व्यवहार उत्तम पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इंटरनेट आणि स्मार्ट फोनअभावी हे पर्याय कुचकामी ठरतात. मात्र, यूएसएसडी हा एकमेव पर्याय स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय काम करतो. अाधी त्यांनी स्वत: हा पर्याय तपासला. तो कामाचा ठरल्यानंतर इतरांना सांगण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. शाळा, कॉलेज, बाजारपेठा, सरकारी कार्यालये इथपासून ग्रामीण भागात जाऊन प्रात्यक्षिकांद्वारे ते यूएसएसडीचा प्रसार करत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...