आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याची थाप मारून हातसफाई, दोघांनी एका महिलेची केली हातोहात फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘मंगळसूत्रचोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. आजी तुम्हीही मंगळसूत्र कागदात बांधून पिशवीत ठेवून द्या’ असे सांगत पोलिस बनून वावरणाऱ्या दोघांनी एका महिलेची हातोहात फसवणूक केली. टिळकनगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मधुमालती वसंतराव ठाकरे (७५, रा. विश्वभारती कॉलनी) यांनी तक्रार दिली असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

रविवारी सकाळी टिळकनगर येथील बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन ठाकरे या घरी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस असल्याचे सांगत “रात्री या भागात चोरी झाल्यामुळे सर्वांची तपासणी सुरू असून गळ्यातील मंगळसूत्र पर्समध्ये टाका’, अशा सूचनाही त्यांनी केल्या. ठाकरे थोड्या पुढे जाताच या दोघांनी त्यांना आवाज देत मंगळसूत्र कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार ठाकरे मंगळसूत्र ठेवत असतानाच आरोपींनी त्यावर स्वाक्षरी करून देतो, असे सांगत कागदाची पुडी हातात घेतली. स्वाक्षरी करण्याचे नाटक करत भामट्यांनी दुसरीच पुडी ठाकरे यांच्या हातात दिली. बोलणे संपताच दोघे पसार झाले. मात्र, संशय आल्यामुळे ती पुडी तपासली असता त्यात मंगळसूत्राऐवजी वाळूचे खडे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 
 
बातम्या आणखी आहेत...