आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी सीपींचे खास असणाऱ्या चार्लींवर आता हवालदारही ओरडतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रत्येक सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याची काम करण्याची स्वतंत्र पद्धत असते. तरीही जुन्या अधिकाऱ्याच्या काही लोकोपयोगी यंत्रणा नव्या अधिकाऱ्याने कायम ठेवाव्यात, अशी अपेक्षा असते. परंतु, ती पूर्ण होत नाही. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराच्या कानाकोपऱ्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमलात आणलेली चार्ली पोलिस यंत्रणा विद्यमान आयुक्त यशस्वी यादव यांनी गुंडाळून टाकली आहे. सहा महिन्यांपूर्वी हीरो असलेले चार्ली आता झीरो होत आहेत.

शहरातील छोट्या-मोठ्या गुन्हेगारी घटनांची मुख्यालयाला तत्काळ माहिती मिळावी आणि त्याचा तपासही वेगात व्हावा, गुन्हेगारांवर वचक बसावा, अगदी वाहतुकीची  कोंडीही काही मिनिटांत फुटावी, यासाठी अमितेशकुमार यांनी जून २०१६ मध्ये चार्ली पथक स्थापन केले. काळे बूट, डोक्याला काळा रुमाल बांधून दुचाकीवर २४ तास फिरणारे चार्ली चर्चेचा विषय ठरले होते. 

१६२ ते ७०
अमितेशकुमार यांनी स्थापन केलेल्या पथकात १५२ तरुण आणि १० महिला कर्मचारी होते. आता ही संख्या ७० वर आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...