आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक वायू हवेत साेडत नसल्याचा कंपन्यांचा दावा, केमिकल कंपन्यांची पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण  - पैठण  वसाहतीतील काही केमिकल कंपन्या रात्रीतून गॅसयुक्त वायू हवेत साेडत असल्याने परिसरातील अनेक गावांतील गावकऱ्यांना श्वसनाचे विकार हाेत असल्याच्या वाढत्या तक्रारी अाहेत. याप्रकरणी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित वृत्तानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अाैरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी केमिकल कंपन्यांची पाहणी केली असून अहवाल अाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत अाहेत. दुसरीकडे हवेमध्ये काेणत्याही प्रकारचे घातक रसायन अथवा वायू साेडला जात नसल्याचे पैठण इंडस्ट्रियल असाेसिएशनने निवेदनात म्हटले अाहे.  
 
पैठण अाैद्याेगिक वसाहतीत ४ ते ५ केमिकलचे कारखाने असून या सर्व कंपन्या लघुउद्याेगाच्या श्रेणीत माेडतात. यापैकी काेणत्याही कारखान्यात घातक वायू निर्माण हाेत नाही तसेच काेणत्याही कारखान्यात अशा प्रकारचा वायू साठवून ठेवत ताे रात्रीतून हवेत साेडण्याची यंत्रणा नसल्याचे पैठण इंडस्ट्रियल असाेसिएशनने म्हटले अाहे.  
 
नियमांचे पालन हाेते  
- अत्यंत जिकिरीच्या परिस्थितीत पैठणमधील छाेटे उद्याेग कार्यरत असून कामगारांच्या हितांचा विचार करत प्रदूषण नियंत्रण मंडळांचे सर्व नियम अाणि निकषही पाळले जात असल्याने काेणतीही कंपनी अशा प्रकारे हवेत वायू साेडत नाही. 
- रवींद्र अाेझा, अध्यक्ष, पैठण इंडस्ट्रियल असाेसिएशन.   
 
दाेषींवर कारवाई करू  
- ज्या कंपन्या नियमांप्रमाणे काम करतात त्यांनी घाबरून जाऊ नये. एमअायडीसीतील काही केमिकल कंपन्यांची पाहणी केली. ज्या कंपन्या रात्री हवेत गॅसयुक्त वायू साेडत असतील त्यांच्यावर अहवाल अाल्यावर कारवाई केली जाईल.
- जे. एम. कदम, उपकार्यकारी अभियंता, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अाैरंगाबाद
 
बातम्या आणखी आहेत...