आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल, पोलिसांचा बंदोबस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराची मुख्य मिरवणूक संस्थान गणपती ते क्रांती चौकमार्गे निघणार आहे, तर टीव्ही सेंटर ते सिडको-हडको आणि गजानन महाराज मंदिर येथूनही मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 
 
हेमार्ग राहणार बंद : संस्थान गणपतीपासून निघालेली मिरवणूक शहागंज-महात्मा गांधी पुतळा-सिटी चौक-गुलमंडी-बाराभाई ताजिया-पैठण गेट-सिल्लेखाना चौक-क्रांती चौकामार्गे जाईल. सिडको-हडको उत्सव समितीची मिरवणूक हडको, एन-१२, टीव्ही सेंटर चौक-जिजामाता चौक-एम-२, एन-९, शिवनेरी कॉलनी-पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, ओंकार चौक, बजरंग चौक, अाविष्कार चौकामार्गे शिवाजी महाराज पुतळा चिश्तिया कॉलनी चौकात जाईल. गारखेडा परिसरातील मिरवणूक पतियाळा बँक चौक-गजानन मंदिरामार्गे जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या चौकात जाईल. 

असे असतील पर्यायी मार्ग : शहागंजहूनसिटी चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी चेलीपुरा चौक-लोटा कारंजा, कामाक्षी लॉज चौकाचा वापर करावा. क्रांती चौकाकडून जाणाऱ्या वाहनांनी गुलमंडी, सिल्लेखाना-कार्तिकी हॉटेल चौक-भडकल गेट मार्गाने जावे. 

वाहतूक शाखेचे चार पोलिस निरीक्षक, आठ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक शंभर कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत, तर बॉम्बशोधक, नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक तसेच अधिकारी १४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ठाण्यातील १४ पोलिस निरीक्षक, ६९ सहायक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक, एक हजार २६५ पुरुष कर्मचारी आणि ७५ महिला कर्मचारी अहोत. 

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती रोषणाई केली अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...