आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न, तीन मामांविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुण्याच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन मामांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २६ एप्रिल रोजी मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. बालगृहाच्या निरीक्षक लता राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मूळ अंबड तालुक्यात राहणाऱ्या या मुलीला काही वर्षांपूर्वी पुण्यातील नाना पेठ येथील बालगृहात दाखल करण्यात आले होते; परंतु तिचे तीन मामा गणेश , नारायण आणि लक्ष्मण डाकूरकर (रा. मुकुंदवाडी) या तिघांनी तिला पुणे येथील बालगृहातून घरी आणले. मार्च महिन्यात मुलीचा देऊळगाव येथील एका मुलाशी लग्न जुळवले. 

२६ मार्च रोजी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाची तारीखही नक्की करण्यात आली; परंतु त्या आधीच या प्रकरणाची माहिती बालगृहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. पोलिसांनी मुलीची सुटका करून ३० एप्रिल रोजी आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...