आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- मुलांनो सुटीत इथे या, पाहिजे तेवढा वेळ बसा अन् हवं ते वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुलांनो,अभ्यासाची पुस्तके तुम्ही वर्षभर वाचता. यंदा उन्हाळी सुटीत इथे या, पाहिजे तेवढा वेळ बसा अन् हवं ते वाचा, असा संदेश देत विभागीय शासकीय ग्रंथालयात खास बच्चे कंपनीसाठी वाचन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात साहस कथा, आत्मचरित्रे, रंगीबेरंगी छायाचित्रांची अन् परीकथेची पुस्तके मुलांना स्वत:च्या हाताने निवडता येतील. त्यासाठी खास छोट्या दोस्तांना आवडणारी खुर्ची आणि यातूनही ते कंटाळले तर आवडीचे गेमही ठेवण्यात आले आहेत. 

समर्थनगरातील विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या वतीने पुढील आठवड्यापासून खास छोट्या वाचकांसाठी बाल वाचन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वयानुसार त्यांना आवडणारी सचित्र पुस्तके उपलब्ध करून देणे आणि ग्रंथालयांनी त्यांच्यापर्यंत जाणेदेखील आवश्यक आहे. या हेतूने बाल वाचन कक्ष सुरू केला जात अाहे. मुले वाचत नाहीत अशी ओरड बऱ्याच वेळा होते. परंतु त्यांना वाचायला काय अावडतं हे जाणून घेऊन तशी पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. या कक्षात मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकेही आहेत. पुढील आठवड्यापासून म्हणजेच मेपासून सकाळी १० ते या वेळेत मोफत या वाचनकक्षाचा आनंद छोट्या वाचक दोस्तांना घेता येणार आहे. 
 
वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न 
-वाचन संस्कृती वाढविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासह मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक स्वत:च्या हाताने घेऊन वाचण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. वातावरण निर्मितीसाठी या कक्षात मुलांकरिता खेळणी आणि गेमही आहेत. -अ. मा. गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक 
बातम्या आणखी आहेत...