आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेटसाठी केला खून; रिक्षाचालकाला जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून दुकानदाराचा खून करणाऱ्या रिक्षाचालकाला जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सतीश श्रीसुंदर (२०) असे आरोपीचे नाव आहे. 
 
कन्नड येथील शिवशंकर कॉलनीत राहणारे जगन्नाथ एकनाथ येवले (६६) या किराणा दुकानदाराचा मुलगा उमेशकडे १५ मार्च २०१४ रोजी रिक्षाचालक सतीश श्रीसुंदर याने उधारीत सिगारेट मागितली. मात्र, उमेश यांनी नकार दिल्याने सतीश त्याच्या अल्पवयीन भावाने त्यांना मारहाण केली. सतीशने उमेश यांच्या डोक्यात हातोडा मारला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर घाटीत हलवण्यात आले असता उपचार सुरू असताना २६ मार्च रोजी उमेशचा मृत्यू झाला. उमेशचे वडील एकनाथ येवले यांच्या तक्रारीवरून कन्नड पोलिस ठाण्यात रिक्षाचालक सतीश श्रीसुंदर आणि अल्पवयीन भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

फौजदार ए. एस. सिद्दिकी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश उत्तम तेलगावकर यांच्या समोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी नऊ साक्षीदार तपासले. सतीशने खून केला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.
बातम्या आणखी आहेत...