आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटाला ४६ शौचालये उभारली तरच २०१९ ला होऊ शकते लक्ष्यपूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वर्षापूर्वी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने ९८ दशलक्ष शौचालये बांधून २०१९ पर्यंत देशातील प्रत्येक घरांत शौचालय होईल असे जाहीर केले. त्यानुसार लक्ष्यपूर्तीसाठी मिनिटाला ४६ शौचालये बांधणे आवश्यक आहे. मात्र, २०१४-१५ या आर्थिक वर्षांत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मिनिटाला केवळ ११ शौचालये उभारण्यात आली आहेत. हा वेग लक्षात घेता घरोघरी शौचालयाचे मिशन पाच वर्षांत अपुरे राहणार असे सध्याचे चित्र आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित माहिती..
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यूपीए सरकारने निर्मल भारत अभियान त्यापूर्वीच सुरू केले होते. मात्र, २०१२ ते २०१४ या काळात शौचालय उभारणीचा वेग मंदावला असल्याचे मोदी सरकारच्या लक्षात आले. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेपासून (मनरेगा) वेगळे करण्यात आले. त्यानुसार २०१९ पर्यंत देशात ९८ दशलक्ष शौचालय उभारणीचे लक्ष्य ठरवण्यात आले. याचाच अर्थ लक्ष्यपूर्तीसाठी दिवसाला ६७ हजार किंवा मिनिटाला ४६ शौचालयाची उभारणी आवश्यक आहे. मात्र, मिनिटाला ११ शौचालये उभारण्यात आली आहेत. हा वेग पाहता लक्ष्यपूर्तीसाठी २०३२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.