आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:...म्हणे दिव्यांची टेस्टिंग सुरू होती, आयुक्तांनी विचारणा करताच विद्युत विभागाने वाचले जुनेच पाढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -दिवसा ढवळ्या शहरभरात ‘दिवे’ लावून अकार्यक्षमतेचा ‘उजेड’ पाडणाऱ्या अधिकाऱ्यांनी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना टेस्टिंग सुरू असल्यामुळे हे दिवे सुरू होते, असे नेहमीप्रमाणे अजब उत्तर दिले आहे. टेस्टिंगच करायची होती तर त्यासाठी सर्वत्र एवढे शेकडो दिवे लावण्याची गरज आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच आयुक्तांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी हे उत्तर देत दिशाभूल केली आहे. अखेर आयुक्तांनी हा टेस्टिंग रिपोर्ट मागवला आहे. त्यातून ही टोलवाटोलवी स्पष्ट होईल. 
वीज बिलाची २१ कोटी थकबाकी ठेवल्याने महावितरणने पथदिव्यांचे कनेक्शन कापून शहराला पाच दिवस अंधारकोठडीची शिक्षा दिली. पण एवढे होऊनही विजेची बचत करण्याऐवजी उलट शहरभरात दिवसा दिवे सुरू ठेवून मनपाचा विद्युत विभाग विजेची उधळपट्टी करत आहे. 
वर्षानुवर्षेदिली जातात तीच ती कारणे : वृत्तप्रसिद्ध होताच आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा विद्युत विभागाने टेस्टिंग सुरू असल्याने दिवे सुरू होते, असे अजब उत्तर दिले. असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘हवा सुटली का तारा हलतात, टायमर सिस्टिममध्ये बिघाड आहे. तर, कधी भूमिगत केबल तुटली, ओव्हरहेड केबल नाही. काही वेळा फ्यूज निकाली झाले, पॅनल बॉक्स खराब आहे, अशी वेगवेगळी कारणे देत जबाबदारी ढकलण्याचा प्रकार विद्युत विभागाने केला आहे. 

टायमर खराब झाले 
मुळातदिवेचालू-बंद करण्याची जबाबदारी मनपाचीच आहे. मनपाच्या नावाने विद्युत मीटर बसवले आहेत. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली असता आमचेच टायमर खराब असल्याची बाब समोर आली. ते तातडीने दुरुस्तीसाठी आम्ही अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला रवाना केले आहे. अशोकखैरे, अधीक्षकअभियंता, एमएसआरडीसी. 

एमएसआरडीसीच्या अधीक्षक अभियंत्यांनी घेतली दखल 
उड्डाणपुलावरील दिव्यांची जबाबदारी एमएसआरडीची असल्याचे मनपाने स्पष्ट केल्यानंतर एमएसआरडीकडे विचारणा केली तेव्हा मीटर मनपाच्या नावाने असल्याने विद्युत बिल आणि दिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर एमएसआरडीचे अधीक्षक अभियंता अशोक खैरे यांनी उड्डाणपुलावर दिवे सुरू असल्याचे वृत्त वाचून अभियंत्यांशी चर्चा केली. टायमर सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लगेच त्यांनी ठेकेदार मनीष महाजन आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन तासाच्या आत टायमर दुरुस्त करा दिवे बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने टायमर दुरुस्तीचे काम हातीही घेतले आहे. 

काय म्हणतात अधिकारी 
आयुक्तांच्याआदेशानंतरआम्ही गल्लीबोळातील सर्व दिव्यांची सकाळपासूनच पाहणी केली. उड्डाणपुलावरचे दिवे मनपाकडे हस्तांतरित झालेले नाहीत. आयुक्तांच्या सूचनेनुसार एमएसआरडीसीच्या विद्युत विभागचे प्रमुख मनीष महाजन यांना कळवून दिवे बंद करण्यात आले. यापुढे असा प्रकार होणार नाही. टेस्टिंगच्या वेळेतही बदल केला आहे.
के.डी. देशमुख, प्रभारीउपअभियंता, मनपा. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...