आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारपुत्र नगरसेवकाची गोळ्या घालण्याची भाषा!; पेट्रोलपंप अतिक्रमणाचा वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरण झाले नाही तर आठ दिवसांत राजीनामा देईन, अशी घोषणा करणारे आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाठ यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी ढोंगी असल्याचे सांगत राजीनामा देण्याचा निर्णय फिरवला. अतिक्रमणे काढूनच दाखवा, बघून घेईन, अशा निनावी फोनवरून धमक्या येत असल्याचे सांगतानाच त्यांनी माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. वेळप्रसंगी गोळ्या घालीन, पण माझ्या ध्येयापासून हटणार नाही. रस्ता रुंद करूनच राहीन, अशी भाषा वापरली. 

सिद्धांत यांनी दिलेली मुदत मंगळवारी संपणार असल्याने महापालिकेचे पथक सोमवारी सकाळीच रेल्वेस्टेशन परिसरातील चार मालमत्ता पाडण्यासाठी गेले. त्यात एक पेट्रोलपंप आणि तीन हॉटेलचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत हे पथक तेथे होते. पथकाला विरोध होतोय, पोलिस बंदोबस्त कमी आहे, अशी वेगवेगळी कारणे पथक पुढे करत होते. दगडफेक झाल्याचे सांगत त्यांनी पाडापाडी केली नाही. सायंकाळी ते रिकाम्या हाताने परतले. म्हणजे आम्हाला कारवाई करायची होती; परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कारवाई करता आली नाही, असे भासवण्याचा हा प्रयत्न होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेला आला. सोमवारी पालिका पथक येथे गेले होते. तो केवळ देखावा होता, प्रत्यक्षात त्यांनी पाडापाडी करायचीच नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. 

धमकी देणारा क्रमांक देण्यास नकार 
ज्याक्रमांकावरून शिरसाट यांना धमकी देण्यात आली, तो क्रमांक ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याकडे मागितला. मात्र, तो क्रमांक देण्यास त्यांनी नकार दिला. खूप क्रमांकांवरून फोन आले, धमकीचा क्रमांक नेमका कोणता, हे आता लक्षात नसल्याचे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...