आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडाई सदस्यांचे अाज ‘कामबंद’, परमार यांच्या अात्महत्येचे पडसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रचेंबर अाॅफ हाैसिंग इंडस्ट्रीचे ठाण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी अात्महत्या केल्याचे पडसाद इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही उमटत असून, क्रेडाईने मंगळवारी (दि. १३) कामबंद ठेवण्याबराेबरच अार्थिक व्यवहार करण्याचा निर्णय घेतला अाहे. क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी ही माहिती दिली.

ठक्कर म्हणाले की, परमार यांच्या अात्महत्येनंतर पाेलिस तपासात आढळलेल्या सुसाईड नाेटमध्ये अात्महत्येमागील कारणे समोर आली. त्यात प्रामुख्याने सरकारची गृहनिर्माण क्षेत्र नियंत्रण धाेरण, अात्महत्येला प्रवृत्त हाेईपर्यंत अडचणीत अालेले िवकसक यांचा समावेश आहे. त्यामुळे मंगळवारी बांधकाम व्यावसायिक अापले कामबंद ठेवणार अाहेत. या वेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, अार्किटेक्ट असाेसिएशनचे अध्यक्ष अार. के. सिंग, राजूभाई ठक्कर, सुरेश पाटील, अभय तातेड, शंतनू देशपांडे, कुणाल पाटील, सुनील गवांदे, सुजाॅय गुप्ता अादी उपस्थित हाेते. दरम्यान, या प्रश्नी महापालिका अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना क्रेडाईतर्फे निवेदन देण्यात अाले. क्रेडाईचे २६२ सदस्य मंगळवारी कामबंद ठेवणार अाहेत. बांधकाम व्यवसायाशी निगडित सुमारे एक लाख कामगारांचाही यात समावेश राहील.

व्यावसायिकचक्रव्यूहात : पर्यावरणाच्यारखडलेल्या परवानग्या, केंद्र, राज्य सरकारचे असुसंगत कायदे, नियमांमुळे उभ्या राहणाऱ्या अडचणी, यामुळे अनेक गृहप्रकल्प अर्धवट असून एकीकडे मागणीत घट, दुसरीकडे तयार असलेल्या गृहप्रकल्पांवर सरकारकडून लादला जाणारा कर, व्याजाचा भुर्दंड या चक्रव्यूहात व्यावसायिक अडकले. यातून मार्ग निघेल या अपेक्षेवर दिवस लोटत असताना प्रश्न सुटण्याएेवजी गंभीर हाेत आहे. त्यातूनच अात्महत्येपर्यंतची वेळ येऊन ठेपल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात अाले.

काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देताना क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर. समवेत उपाध्यक्ष राजूभाई ठक्कर, सुरेश पाटील सदस्य.
अशा घटनांची पुनरावृत्ती नकाे...
सरकारनेविविध परवानग्या, कायद्यातील सुसूत्रतेअभावी येणाऱ्या अडचणी याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज अाहे. याशिवाय, काेणावरही परमार यांच्यासारखी वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे अाहे. जयेशठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक