आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळी बायको करून दिली म्हणून, भावजयीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दिराला जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अौरंगाबाद - काळी बायको करून दिल्याच्या रागातून भावजयीला लाकडी दांड्याने गंभीर मारहाण करणाऱ्या भावजयीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मोठ्या दिराला जन्मठेप हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी सोमवार, 7 ऑगस्ट रोजी ठोठावली. 
 
या प्रकरणी मृत कविता विलास राजाळे (२२) हिचे वडील रमेश म्हसूजी केळकर (४०, रा. राममूर्ती, जालना) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, कविता हिचे लग्न विलास याच्याशी २०११ मध्ये झाले होते. लग्नापूर्वी कविताला पाहण्यासाठी आरोपी विठ्ठल अशोक राजाळे (३२, रा. काऱ्हाळे, ता. जि. औरंगाबाद) हा आला होता. मात्र काळी असल्याचे कारण देत आरोपी विठ्ठल हिने कविताला नाकारले होते. त्यानंतर कविताचे लग्न विठ्ठल याचा लहान भाऊ विलास याच्याशी झाले होते. लग्नानंतर कविताने आपल्या मामाची मुलगी शारदा हिचे स्थळ विठ्ठल याला सुचविले विठ्ठल याचे लग्न शारदा हिच्याशी झाले होते. मात्र त्यानंतरही ‘तू मला काळी बायको करून दिली’ असे म्हणत विठ्ठल हा कविताला सतत शारीरिक-मानसिक त्रास देत होता. मारहाण करत होता. त्याच कारणावरून एकदा विठ्ठल याने कविताला मारहाण केली होती यात कविताला १५ टाके पडले होते. दरम्यान, फेब्रुवारी २०१५ रोजी कविता घरात एकटीच असताना काळ्या मुलीशी लग्न लावून दिल्याच्या रागातून विठ्ठल याने कविताच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण केली यात कविता गंभीर जखमी होऊन मरण पावली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल याच्याविरुद्ध कलम ३०२, ५०६, ३२३ अन्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. खटल्यावेळी सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात आरोपीची पत्नी शारदा हिच्यासह दोन साक्षीदार फितूर झाले. मात्र परिस्थितीजन्य पुरावा अन्य बाबींचा विचार करून कोर्टाने आरोपीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप एक हजार रुपये दंड दंड भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 
बातम्या आणखी आहेत...