आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीत वर्षभरापासून वाढले गुन्हेगारीचे प्रमाण; नियंत्रण मिळवण्यात पोलिस अपयशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- शहरात तालुक्यात गेल्या वर्षभरापासून घरफोड्या, चोऱ्या, हाणामाऱ्या, पाकिटमारी आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शहरातील तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार अपयशी ठरत असून याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून एखाद्या खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 

पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी अवैध धंदे चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिस स्टेशनमधील अधिकारी पोलिसांचा वचक कमी झाला. दुसरीकडे गुंडांची दहशत वाढत चालली आहे. गुन्हा दाखल करताना ज्या गुन्ह्यात ‘अर्थ’ नाही, असे गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते, तर ज्या गुन्ह्यात ‘अर्थ’ आहे, असे गुन्हे फिर्यादीला बसवून घेऊन तत्काळ दाखल केले जातात. 

कडक शिस्तीचा अधिकारी मिळाला, तर गुन्हेगारीवर वचक निर्माण करता येतो, हे यापूर्वीच्या परिविक्षाधीन अधिकारी अविनाश कुमार, डॉ. राहुल खाडे यासारख्या अधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अधिकारी काय असतो हे त्यांनी शहराला तालुक्याला दाखवून दिले होते. पोलिस स्टेशनला किरकोळ तक्रार झाली की, ‘सेटलमेंट’ करणाऱ्यांची रांग पोलिस स्टेशनला लागते. यातूनच अर्थकारण घडून कित्येक प्रकरणे रफा-दफा केली जातात. 

वरिष्ठांनी लक्ष द्यावे 
उपविभागीयपोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांनी पाथर्डी-शेवगावचा पदभार घेतल्यानंतर अवैध धंद्यांना आळा घातला होता. मात्र, काही दिवस जाताच शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले. अवैध धंद्यांना आळा घालण्यास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार अपयशी ठरत आहेत. असे असताना वरिष्ठ मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे आता तरी वरिष्ठ कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले. 
बातम्या आणखी आहेत...