आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकरू गेलं, आता काय करू? प्रेयसीच्या वडिलाने झाडलेल्या गोळीने घेतला युवकाचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनायकच्या मृत्यूनंतर आई नम्रता यांनी हंबरडा फोडला. (दुसऱ्या छायाचित्रात) व्यथित झालेले वडील शिवानंद हुबळीमठ. - Divya Marathi
विनायकच्या मृत्यूनंतर आई नम्रता यांनी हंबरडा फोडला. (दुसऱ्या छायाचित्रात) व्यथित झालेले वडील शिवानंद हुबळीमठ.
सोलापूर- हातचा आलेला १७ वर्षांचा मुलगा हकनाक गेल्याचे अतीव दु:ख आणि वेदना वडील शिवानंद हुबळीमठ यांच्या बोलण्यातून जाणवत होत्या. ‘माझ्या मुलाने असा काय गुन्हा केला, त्याला स्वातंत्र्यदिनी गोळ्या घातल्या? समजावले असते तर ऐकले असते त्याने.
आमच्यासारख्या गरिबावर हा प्रसंग का आला? गोळ्या लागल्यानंतर ‘आई, आई’ म्हणत घरासमोर पडला. दवाखान्यात ‘बाबा, आई कुठं आहे?’ असे म्हणत होता. तो गेला आता आम्ही काय करावे?’ असे अनेक प्रश्न त्यांच्या बोलण्यातून उपस्थित होत होते. पित्याची ही अवस्था पाहून नातेवाइकांसह परिसरातील महिला, तरुणांचे डोळे पाणावले. सारा परिसर स्तब्ध झाला होता.

विनायक हुबळीमठ मृत्यू पावल्याची माहिती सकाळी कळताच घोंगडे वस्तीत त्याच्या घरासमोर गर्दी झाली होती. ‘कुणीही येतो आणि गोळी घालतो. आम्ही गरीब आहे. हाताला आलेला मुलगा त्यांनी मारला. त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
आता आम्ही कसं जगायचं सांगा.’
दुपारी मृतदेह घेऊन शववाहिका घराजवळ आल्यानंतर आई नम्रता यांना चक्कर आली. भाऊ ओंकार, बहीण ऐश्वर्या यांनाही भावाचा मृतदेह पाहून घालमेल होत होती. सायंकाळी विनायकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवानंद बाळीवेस परिसरात पूजा साहित्य विकतात. पुजारी म्हणून काम करतात.
नव्या पिढीला समजून घ्या, मुक्त संवाद ठेवा
नवीनपिढी जात-धर्म याच्या पलीकडे पाहते. किशोरवय आणि तरुण यामध्ये एकमेकांकडे आकर्षण, प्रेम-भावना असतात. पण, आपण याकडे कसे पाहायचे. आपले करिअर महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला समजून घेतले पाहिजे. चांगले, वाईट काय हे मुक्त संवादातून सांगितले पाहिजे. कुमारवयीन मुला-मुलींच्या भावना, मानसिक पातळीवरील बदल समजून घेतले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. विनायक हुबळीमठ या मुलाला गोळी घालून मुलीच्या वडिलांनी मारले. यावर मान्यवर व्यक्तींशी केलेला मुक्तसंवाद. त्यातून आलेल विविध पैलू.
पित्याचा आर्त प्रश्न, घोंगडे वस्तीमधील महिलांचे पाणावले होते डोळे

करिअर करण्यास प्राधान्य द्यावे
रवींद्रसेनगावकर पोलिस आयुक्त :

किशोरवयात प्रेम नसते, आकर्षण असते. बावीस-तेवीस वयात कळतं प्रेम आणि मैत्री काय आहे. करिअरला प्राधान्य हवे. प्रेम अन्य बाबी नंतर आहेत. घडलेला प्रकार दुर्देवी आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपूर्ण परिवाराला झळ बसते...
डॉ.दिलीप बुरटे, मानसोपचार तज्ज्ञ

सामाजिकवातावरणही मनावर परिणाम करते. रागाच्या भरात हातून चूक होते. संपूर्ण परिवाराला याची झळ बसते. स्वतंत्र विचार कळले पाहिजे. ठरावीक व्यक्तिमत्त्वावर काही घटक परिणाम करतात. असे कृत्य नुकसान करणारे आहे.

नव्या पिढीला समजून घ्यावे
अॅड.गोविंद पाटील, राज्य कार्यवाह अंनिस

नवीनपिढी जात, पंथ मानत नाही. पालकांनी समजून वागल पाहिजे. त्यांच्यावर बंधन लादू नयेत. समाजाचा प्रवाह, जातीभेद, नवीन विचार करणारा वर्ग आहे. सजगतेने सामोरे गेले पाहिजे. काळ बदलत आहे. ते पालकांनी समजून घेतले पाहिजे.

रागात कृती, नंतर होतो पश्चाताप
प्रीतीश्रीराम, सामाजिक कार्यकर्त्या, अभ्यासक
किशोरवयातमुला-मुलींमध्ये आकर्षण असते. यावेळी पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. बंदूक घेऊन मारणे योग्य नाही. रागाच्या भरात हातून चूक होते. नंतर पश्चाताप होतो. निखळ मैत्री असावी. प्रत्येकाला समजून घ्यावं.

कदाचित अनर्थ टळला असता...
१५ ऑगस्ट रोजी विनायक बंगळुरूला जाणार होता. रात्री साडेदहाला बर्थ तिकीट काढले होते. गावाला जाण्याची तयारी करत होता. साठेआठला त्याच्यावर हा प्रसंग बेतला. दोन तासांचा फरक पडला, असे म्हणत वडिलांनी रेल्वे तिकीट दाखवले.