आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटांची चणचण अन् जाचक अटींमुळे शालेय सहलींवर संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच वर्षअखेरीस शाळांमध्ये जाणाऱ्या शैक्षणिक सहलींवरही दिसून येत आहे. नोटाबंदीमुळेच काही शाळांनी सहली रद्द केल्या आहेत, तर काही शाळांनी लांब पल्ल्याच्या सहलींचे स्वरूप बदलून स्थानिक सहलींचे नियोजन केले आहे. तसेच सहलीदरम्यान अपघात झाल्यास त्याची सर्व जबाबदारी प्राध्यापक आणि शिक्षकांवर लादलेल्या जाचक अटींमुळे सहली काढण्यास अनेक शाळा नकार देत आहेत.
दिवाळी सुटीनंतर सर्वच शाळांध्ये नैसर्गिक सहल, पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती व्हावी, शेअरिंगची सवय लागावी, साहस निर्माण व्हावे यासाठी सहलीचे आयाेजन केले जाते.
सहल नव्हे, क्षेत्रभेट
-आमच्याकडे मागेचसहल काढणे बंद केले आहे. प्राथमिकचे वर्ग असल्याने ही मुले खूप लहान असतात. त्यामुळे आम्ही शहरातच क्षेत्रभेटीचे आयोजन करतो. ज्यात खर्चही कमी येतो. शिवाय मुलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना आपल्या शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टींची माहिती मिळते.
सुरेशपरदेसी, मुख्याध्यापक, मुकुल मंदिर प्राथमिक शाळा
दिवाळीपूर्वीच सहल
- आम्ही दिवाळीतचसहलीचे नियोजन केले होते. चेकने पैसे स्वीकारण्यात आले होते. नुसत्या नोटाबंदीमुळे नाही, तर सहलीदरम्यान अपघातास प्राचार्य, शिक्षक जबाबदार या जाचक अटींमुळे सहलींवर परिणाम झाला अाहे. संध्याकाळकर, मुख्याध्यापक, कलावती चव्हाण विद्यालय.

- प्रवास आणिशेअरिंगची सवय मुलांना लागावी, इतरांमध्येही त्यांना सहभागी होता यावे यासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व शालेय जीवनात खूप आहे. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यास सहलीसाठी लागणारा खर्च परवडणार नाही. त्यामुळे आता वर्गांनुसार क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या अभ्यासक्रमातीलच काही निवडक ठिकाणांची निवड या क्षेत्रभेट सहलीत करण्यात येते. उज्ज्वलानिकाळजे
-जाधव, शारदा मंदिर कन्या प्र.

मुलांना सवय लागावी म्हणून
-समुद्र किनारे, नदी, तलाव, उंच टेकड्या आदी ठिकाणी सहली काढू नयेत.
-माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडेसाठी परवानगी देऊ नये.
-सहलीदरम्यान झालेल्या अपघातास प्राचार्य, शिक्षक जबाबदार राहतील.
-सहलींसाठी एसटी बसेस वापराव्यात.
असे आहेत नवे नियम
बातम्या आणखी आहेत...