आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू केंद्रातही भरता येणार पीक विमा, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तालुुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ  - शेतकऱ्यांची हेळसांड थांबावी यासाठी आता शेतकऱ्यांना जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये पीक विमा भरता येणार असून पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पीक विमा काढण्याचे आवाहन  तालुका कृषी अधिकारी वैजिनाथ हांगे, मंडळाधिकारी अशोक अहिरे, विशाल आगलावे यांनी केले आहे.
 
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्याच्या हेतूने शासनाने त्यात काही बदल केले असून आता पीक विमा आपल्या गावातील अधिकृत महा ई-सेवा केंद्रात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अाहे. याविषयी कृषी विभागाने नुकतेच प्रसिद्धिपत्रक जारी केले. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक विमा भरण्यासाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे. पूर्वी पीक विमा भरण्यासाठी कृषी सहायकाकडे आणि बँकेत तासन््तास उभे राहून अर्ज करावा लागत असे.  या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.  योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेचे आधार कार्ड जोडणीसाठी बँकेशी संपर्क साधावा.  
 
पीक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : बँक पासबुक प्रत, ७/१२, ८ अ चा उतारा, पीक पेरा तलाठी प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी.
 
पुढील स्लाइडवर वाचा, पीक विमा हप्ता तपशील...
 
बातम्या आणखी आहेत...