आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुलतानी संकट : रेल्वे प्रशासनाने घेतला बगळ्यांचा जीव, निवा-याच्या झाडावर कु-हाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी, मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी !
त्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी, आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी !

या कवी सुरेश भट यांच्या ओळी रविवारी पक्षी आणि पाखरांच्याच तोंडी होत्या, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. रेल्वेस्थानकातील वाहनतळातील जुने चिंचेचे झाड तोडून रेल्वे प्रशासनाने स्वार्थ साधला. वाहनतळातील गाड्यांवर पक्षी विष्ठा करीत असल्याने रेल्वेने हे झाडच छाटले. त्यामुळे या झाडावर वर्षानुवर्षे वास्तव्य करणारे शेकडो बगळे काही मिनिटांतच बेघर झाले. त्यांची घरटी मोडून पडल्याने अनेक पिल्ले जमिनीवर आपटून मृत्युमुखी पडली. घरट्यांतील सुमारे दीडशेवर अंडी फुटली.

केंद्रासह राज्य सरकारे "झाडे लावा झाडे जगवा, पक्ष्यांना दाणापाणी द्या' असा नारा देत असताना औरंगाबादच्या रेल्वेस्थानक प्रशासनाने रविवारी याच्या उलट कृती केली. दिवसभर अन्नपाण्याच्या शोधात गेलेले बगळे सायंकाळी परतीच्या मार्गावर असतानाच त्यांना सायंकाळी च्या सुमारास आपले घर उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. त्यांची घरटी असलेल्या वाहनतळातील जुन्या चिंचेच्या झाडाची प्रशासनाने छाटणी सुरू केली होती. छाटणी म्हणजे उर्वरितपान

दोन झाडे तोडली: प्रवाशाचा दावा
रेल्वेप्रवासी संतोष तोनगिरे यांनी रविवारी सायंकाळीच "डीबी स्टार'ला फोन करून या वृक्षतोडीबाबत माहिती दिली. वाहनतळ ठेकेदाराच्या संगनमताने गुलमोहराची दोन झाडे तोडल्यानंतर चिंचेचे झाड तोडण्यास सुरुवात होताच तोनगिरे यांनी विरोध केला. पण झाडावर घाव मारणे सुरूच राहिल्याने त्यांनी "डीबी स्टार'च्या चमूला फोन लावला.चमूने रेल्वेस्थानक परिसरात गस्तवरील दोन चार्लींसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर वृक्षतोड बंद झाली. मात्र, दोन वृक्ष बुंध्यासह कापले गेले, तर चिंचेच्या झाडाची छाटणी केली, असा दावा तोनगिरे यांनी केला.
दाणापाण्याच्या शोधात बाहेर पडलेले बगळे परतले तेव्हा त्यांचे घरटेच उद्ध्वस्त झाले होते. बेघर बगळे सकाळपर्यंत या बोडख्या झाडावर बसून होते. छाया : मनोज पराती
सृष्टी संवर्धनचे अध्यक्ष डॉ. िकशोर पाठक, सुश्रुत करमाळकर, विकास खांडेकर, नितीन पाटील यांनी जखमी पक्ष्यांना सिद्धार्थ उद्यानात हलवले. त्यांना खाण्यासाठी मासे दिले. घटनेची माहिती महापौर-उपमहापौरांसह वन विभागाला दिली. वन विभागाच्या लोकांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
सुश्रुत करमरकर, विकास खंदारकर, नितीन पाटील, अथर्व कुलकर्णी यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन ७० पेक्षा अधिक पिल्लांना आम्ही अन्न पाणी दिले. याविषयी वन विभागाला कळवले. पक्ष्यांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. डॉ.किशोर पाठक, सृष्टीसंवर्धन संस्था

पक्षी वाहनांवर विष्ठा करत होते. चिंचेच्या झाडाच्या फांद्याही जमिनीकडे झुकल्या होत्या. त्या तोडण्यात आल्या. याचे काम के. बाबूराव यांनी दिले होते. एस.टी. निकम, स्टेशनप्रबंधक

रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. अवैध वृक्षतोड केली. त्यात पक्ष्यांचा जीव गेला. काही जखमी झाले. यासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विजयपाटील, उद्यानअधीक्षक, मनपा
झाडाच्या फांद्या खाली लोंबकळत असल्याने त्या काही वाहनचालकांच्या डोक्याला डोळ्याला लागल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे गेल्या होत्या.
-ही संधी साधून रेल्वे प्रशासनाने फांद्या छाटल्या. यात शेकडो बगळ्यांचा बळी गेला.
-या जुनाट झाडावर गाय बगळे, साळुंके, खारी, सरडे तसेच इतर पक्ष्यांचीही घरटी होती. सध्या विणीचा हंगाम असल्यामुळे पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात अंडी दिली होती.