औरंगाबाद- मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची १२ फूट उंच लांबलचक दगडी सुरक्षा भिंतीचा भाग कोसळला आहे. दोन्ही बाजूंनी बांधण्यात आलेली ५३ वर्षे जुनी अवाढव्य भिंत जागोजागी वाकली असून तकलादू झाली आहे. तर, दुसरीकडे मंडळाच्या मैदानावरील स्थितीही भयंकर झाली आहे. सर्वत्र बकाली झाली असून व्यासपीठावरील पत्रेही गायब झाले आहेत.
मराठवाड्यातील सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा, नवोदित खेळाडूंची सोय व्हावी या हेतूने १९६४ मध्येे मेजर साळवी यांनी शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागातील खडकेश्वर भागात या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली.
भिंत कोसळून वर्ष झाले
मुलांना खेळण्यासाठी पुरेसे मैदान नसल्याने या मंडळाच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची ओस पडलेली एकर जागा ९९ वर्षांच्या करारावर लीजवर घेतली होती. त्याला दोन्ही बाजूंनी साडेतीनशे फूट लांब आणि अंदाजे १२ फूट उंच अशी लांबलचक दगडी सुरक्षा भिंत बांधली. ही अवाढव्य भिंत गेल्या पावसाळ्यात कोसळून जागोजागी खिंडार पडले.
मैदानावरही सर्वत्र बकाली
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने देखभाल वेळोवेळी दुरुस्ती केल्यानेच या क्रीडांगणावर सर्वत्र बकाली दिसते. ज्यांनी ही संस्था उभारली त्यांच्याच नावाने क्रीडांगणात पॅव्हेलियन उभारले आहे. त्यावरील त्यांचे नावही मिटले आहे, तर दुसरीकडे प्रेक्षकांची आसवनव्यवस्था म्हणून केलेले ओटेही ढासळले आहेत. क्रीडांगणाच्या चारही बाजूने गवत आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत, तर मनपाचे जुनाट स्ट्रीट लाइट खांब आडवे पडले आहेत.
याचा आहे अभिमान: साधारण३० वर्षांपूर्वी याच मैदानावर रणजी ट्रॉफी साखळीतील एक क्रिकेट मॅचही झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील १७ जिम्नॅस्टिक खेळाडूंना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना याच क्रीडांगणाचे मोठे भूषण आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाची प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारा संजय बांगर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकी याच मैदानात खेळला असल्याचे संस्थेचे सचिव अभिमानाने सांगतात, तर दुसरीकडे शहरात साजरा होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि निवडणुकीच्या काळात मातब्बर नेत्यांची सभा गाजवणारे क्रीडांगण म्हणूनही याची ओळख आहे.
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी
मराठवाड्यातीलजिम्नॅस्टिक, बॉस्केटबॉल, ज्युडो, क्रिकेट, कबड्डी तसेच अन्य खेळांच्या राज्य, विभागीय, तालुका आणि जिल्हा स्तरावरील स्पर्धा येथे होतात. त्यामुळे या भिंतीची तातडीने डागडुजी होणे अत्यंत आवश्यक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, लवकरच सर्व काम करणार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)