आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या तरुणीची दिल्ली ते काठमांडू सायकलिंग, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा प्रचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्टँडविथ गर्ल्स संस्थेने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ या घोषवाक्यासह राजधानी दिल्ली ते नेपाळची राजधानी काठमांडू असे ते १५ मार्चदरम्यान इको-सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत औरंगाबादची युवा खेळाडू वर्षा राजेश ससाणे सहभागी होणार आहे. अत्यंत कठीण अशा ११०० किलोमीटर अंतर वर्षाचा चमू पूर्ण करून नेपाळला पोहोचेल. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशभरातील १५ जणांच्या टीममधील वर्षा ही एकमेव महाराष्ट्रीयन मुलगी आहे.
 
वडील मोलमजुरी करतात.. घरची परिस्थिती हलाखीची... प्रचंड मेहनत घेण्याची तयारी... आपल्या जिद्दीच्या जोरावर वेगळे काहीतरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या वर्षा ससाणेने माउंटेनिअरिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तिने जम्मू-काश्मीरमधील प्रशिक्षण केंद्रात बेसिक प्रशिक्षण घेतले. त्याच फिटनेसच्या जोरावर तिने देवगिरी सायकल क्लबतर्फे ‘स्त्री भ्रूणहत्या’ रोखण्याच्या घोषवाक्याच्या औरंगाबाद ते बीड अशी ३०० किमीची सायकलिंग मोहीम यशस्वी केली. यादरम्यान माउंटेनिअरिंगदरम्यान प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक विक्रम सिंग यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली होती. या इको-सायकलिंग मोहिमेसाठी त्यांनी वर्षाशी संपर्क साधला आणि तिला या मोहिमेत सहभागी करून घेतले. 

अनेकांचा मदतीचा हात, सायकल भेट
घरचीपरिस्थिती सर्वसामान्य असताना लाखो रुपयांची आधुनिक सायकल ती खरेदी करू शकत नव्हती. ती साध्या अॅटलस सायकलवर सराव होती. मात्र, ही सायकल मोहिमेसाठी योग्य नव्हती. त्यामुळे तिच्या मनात शंका होती की ती मोहिमेत सहभागी होऊ शकते का नाही. परंतु ती शिकत असलेल्या देवगिरी अभियांत्रिकी एमबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांनी निर्लेपचे सौरभ भोगले यांच्याशी संपर्क साधून तिच्याबद्दल माहिती देताच, सौरभ यांनी अवघ्या दाेन मिनिटांत तिला त्यांनी स्वत: तयार केलेली सायकल भेट दिली. ही सायकल ३० गिअरची असून तिची जवळपास ६५ हजार रुपये किंमत आहे. त्याचप्रमाणे मशिप्र मंडळातर्फे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, नागपाल ग्रुप, व्हॅलू डी कंपनी, प्रो.रमण करडे, प्रो. मंगेश दसरे यांनी तिला भरघोस मदत केली. 

असा आहे प्रवास
येत्या१९ फेब्रुवारी रोजी वर्षा दिल्लीकडे रवाना होईल. त्यानंतर २१ फेब्रुवारीपासून डेहराडून येथे कागदपत्रांची तपासणी, प्रशिक्षण आणि सराव शिबिर होईल. २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत संपूर्ण टीम दाखल होईल आणि मार्च रोजी दिल्लीतील गेट ऑफ इंडियावरून रवाना होईल आणि १५ मार्च रोजी काठमांडू येथे पोहोचेल. स्टँड विथ गर्ल्स संस्थेतर्फे माेहिमेच्या मार्गाचे सर्वेक्षण झाले असून या मार्गातील प्रत्येकी गावात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यानच्या प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध गावांना भेटी, जेवण, राहणे, वैद्यकीय उपचार, तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. प्रवासाच्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवण्यात येणार आहे. 

रोज ३५ ते ४० किमीचा सराव 
यामोहिमेसाठी वर्षा कसून तयारी करत असून सध्या ती दररोज ३५ ते ४० किमी सायकलिंग करते आणि सोबत फिटनेस करत आहे. उस्मानपुरा, जालना रोड, केम्ब्रिजपासून परत औरंगाबाद लेणी आणि पुन्हा उस्मानपुरा असा दररोज कसून सराव करते. तसेच दिवसभरात इतर वेळीही ती सायकलवर प्रवास करते. ती अॅथलेटिक्स, तायक्वांदो, जलतरण खेळातील फिटनेसचा तिला फायदा होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...