आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यारस्त्यांवरील दुभाजक झाले घातक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फुटलेल्या भिंती आडव्या पडलेल्या, तर काही ठिकाणी तुटलेल्या जाळ्या आणि त्यातून बाहेर येणारी माती, तर अनेक ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठानांनी स्वत:च्या सोयीसाठी पाडलेले गॅप... ही स्थिती आहे शहरात असलेल्या रस्त्यांवरील दुभाजकांची. खरे तर शिस्तीत वाहतूक व्हावी यासाठी हे दुभाजक असतात. पण शिस्त लांबच राहिली, उलट हे अजब दुभाजक अपघातांना आमंत्रण देतात. एकीकडे चुकीचे गतिरोधक, तर दुसरीकडे अस्ताव्यस्त झालेले दुभाजक. यामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकतर रस्ते धड नाहीत, त्यात हे वाकडेतिकडे दुभाजक शहराची ‘शोभा’ वाढवतात.
वाहतूक सुरळीत नियमबद्ध पद्धतीने व्हावी यासाठी रस्त्यांवर दुभाजक उभारले जातात. नगर परिषदेच्या काळात नंतर मनपाने शहरातील रस्त्यांवर दुभाजक उभारण्यात आले. साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी शहरातील १२, १८, २४ आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांवर वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन हे दुभाजक उभारले गेले. रस्त्यांच्या मधोमध काही ठिकाणी लोखंडी जाळ्यांचे, काही ठिकाणी काँक्रीटचे दुभाजक बांधले गेले; पण नंतर कधी रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी तर कधी दुरुस्तीसाठी काम केले गेले. हे करताना त्याप्रमाणे दुभाजकातही सुधारणा केली गेली नाही. त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, काही दिवसांतच त्यांचा उपयोग होण्याऐवजी ते अडचणींचे ठरू लागले.

अशी झाली अवस्था
शहराच्याकुठल्याही बाजूला फेरफटका मारला तर दुभाजकांची अवस्था कशी झाली ते लक्षात येते.
{ अनेक ठिकाणच्या दुभाजकामधील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी त्या दुभाजकाच्या बाहेर आल्या आहेत, तर काही ठिकाणी दुभाजकांवर आडव्या पडल्या आहेत.
{ बहुतांश ठिकाणी रस्ता दुरुस्तीदरम्यान दुभाजकांची उंची कमी झाली तर अनेक ठिकाणी ते रोडच्याही खाली गेले परिणामी जमीनदोस्त झाले.
{ अनेक ठिकाणी दुभाजकांच्या भिंती तुटल्या आहेत. त्यातून माती बाहेर पडते.
{ अनेक भागांत व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, हॉटेल्ससाठी त्या-त्या व्यावसायिकांनी दुभाजक फोडून ते पंक्चर करून ठेवले आहेत.
{ अनेक ठिकाणी तर दुभाजकांची उंची इतकी लहान झाली आहे की, एखादा अपघात झाला तर दुचाकीचालक त्या दुभाजकाच्या सिमेंटच्या भिंतीवर जाऊन आदळतो गंभीर जखमी होतो.
व्हाइट टॉपिंगरस्ता दुरुस्तीदरम्यान टेंडर प्राेसेसमध्ये दुभाजकांचे बांधकाम नव्हते. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्नच उद््भवत नाही. ऋषिकेश वाघमारे, सहायकअभियंता,
जे.पी.कन्स्ट्रक्शन

रस्ता सुरक्षा समितीने सुचवावेत उपाय
जिल्ह्यासहशहरातील अपघातप्रवण स्थळांची पाहणी करणे. घडणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा रस्ता सुरक्षितता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. तर इतर विभागांचे अधिकारी या समितीचे सदस्य असतात. प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी समितीमार्फत उपाययोजना सुचवल्या जातात. समितीने दुभाजकांसह इतर समस्यांवर उपाय सुचवावेत.

या व्हाइट टॉपिंग रस्त्यांवरील दुभाजक झाले गायब
{सिडको एन -२ कामगार चौक ते महालक्ष्मी चौक,
{ गारखेडा सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक. पुंडलिकनगर ते जयभवानी चौक, गोपाल स्वीट मार्ट ते अहिल्याबाई चौक.
{ हडकोतील जळगाव रस्ता शरद टी पॉइंट ते टीव्ही सेंटर, टीव्ही सेंटर ते सिद्धार्थ चौक, हिमायतबाग उद्धवराव पाटील चौक ते सिद्धार्थ चौक.
{ उस्मानपुरा परिसरातील उत्सव मंगल कार्यालय ते भाजीवाली चौक.
{ लिटिल फ्लॉवर ते भावसिंगपुरा.
याप्रमुख मार्गांवर व्हावी दुरुस्ती
{सेव्हन हिल्स ते जकात नाका, मौलाना आझाद चौक ते टीव्ही सेंटर, हडको एन-१३ या रस्त्यांवर मध्यभागी दुभाजकच नाही.
{ जवाहरनगर पोलिस ठाणे ते टिळकनगर चौक रस्त्याच्या एकाच बाजूने लोखंडी दुभाजक आहे.
{ क्रांती चौक ते पैठण गेट दुभाजकाला लाेखंडी जाळी असणे अावश्यक.
{ महात्मा फुले चौक ते मिल कॉर्नर दुभाजकाची लोखंडी जाळी दुभाजकावर आडवी पडली आहे. त्याची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे आवश्यक.
{ सिडको एन-५ चिश्तिया चौक ते जकात नाका अन् पुढे बळीराम पाटील शाळा दुभाजकाची उंची वाढवणे.
{ बीड बायपास दुभाजकाचे गॅप भरून काढल्याने या मार्गावर राँग साइडचे प्रमाण वाढले. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.
{ पैठण रोड जंक्शन ते झाल्टा फाटादरम्यान वेळोवेळी होणाऱ्या रस्ता दुरुस्तीत दुभाजकाची उंची खालावली आहे.

दोन्ही बाजूंनीवाहतूक सुरळीत करण्यासाठी दुभाजक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मात्र, आपल्या शहरात ही स्थिती चांगली नाही. कमी उंची, जमीनदोस्त झालेले दुभाजक, आहे त्या दुभाजकांना ठिकठिकाणी पंक्चर केल्याने लोक मोकळ्या जागेतून शॉर्टकट मारतात. अपघात तर होतातच शिवाय वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण पडतो. म्हणून दुभाजकांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यायला हवे. सी.डी. शेवगण, सहायकवाहतूक पोलिस आयुक्त
सर्वच दुभाजकांचीरंगरंगोटी काही खासगी संस्था आणि उद्योजकांमार्फत तर काही मनपाच्या वतीने रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच दुभाजक चांगले करू चुकीच्या ठिकाणी नव्याने बांधकाम होणार आहे. डॉ.विजय पाटील, उद्यानअधीक्षक
काय म्हणतात जबाबदार
दुभाजकांची ही सर्व छायाचित्रे पाहिल्यावर त्यांची अवस्था किती भयंकर आहे हे स्पष्ट होते. योग्य वाहतुकीसाठी ते बनवले असले तरी सध्याच्या त्यांच्या अवस्थेवरून उलट ते वाहतुकीला अडथळा ठरतात अपघातांनाही आमंत्रण देतात.
बातम्या आणखी आहेत...