आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या खेळाडू अभियंत्याचा खंडाळ्यात रेल्वेतून पडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव  - दोन वेळेस राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळलेला जळगावचा अष्टपैलू खेळाडू तथा अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. नवीन नोकरीवर रुजू होण्यासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसने तो पुण्याहून मुंबईला जात असताना हा अपघात घडला. तुषार संजय चिंचोले ( वय २८ रा.स्नेहल बिल्डींग, प्रतापनगर) असे त्याचे नाव आहे.   
 
तुषार हा लोणावळा येथे इंडिया ट्रेड  या कंपनीत नोकरीला होता. गेल्या आठवड्यातच त्याने नोकरी सोडली होती. ठाणे येथील कंपनीमध्ये त्याला नवीन नोकरी मिळाली होती. मंगळवारी तो नोकरीवर रुजू होणार होता. यासाठी तो पुण्यावरून मुंबईला इंटरसिटी एक्स्प्रेसने निघाला होता. खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. सुमारे अडीच तास त्याचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो बंद होता.  त्याच्याजवळील बॅगमध्ये असलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. तुषारचे प्राथमिक शिक्षण ला.ना. विद्यालयात झालेले आहे. तो एक राष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू होता. २००३ मध्ये तो अंडर १४ या वयोगटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. २००५ मध्ये दहावीत असताना अंडर १९ वयोगटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली होती.  
बातम्या आणखी आहेत...