आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितळखोरा लेणी कुंडात पाय घसरून तरुण-तरुणीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
कन्नड  - तालुक्यातील पितळखोरा लेणीतील कुंडात पाय घसरून पडल्याने  तरुण व तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. प्रमोद सिद्धार्थ शिंदे (२५, सिडको, एन ८ औरंगाबाद), शलाका सुनील बिडवई (२१, सिडको एन १ औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.
 
देवगिरी अभियांत्रिकी शिकणारी शलाका आणि प्रमोद  हे दोघे  पितळखोरा लेणी बघण्यासाठी दुचाकी (एम.एच. २९ के ४३६३) वरून आले होते. लेणी बघून ते तेथील पाण्याच्या कुंडाकडे गेले. त्या ठिकाणी जागा शेवाळलेली असल्याने पाय घसरून पडल्याने  त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
 
हे दोघे दुपारी एक वाजेच्या सुमारास बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. सव्वादोन वाजता काही पर्यटक त्या स्थळी गेले असता दोघांचे मृतदेह व काळ्या रंगाची पिशवी पाण्यात तरंगताना दिसली. ही माहिती तेथील पुरातत्त्व विभागाच्या व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचारी साईनाथ काळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यास कळवले. सपोनि शेख हमीद चांद  यांनी तत्काळ पोलिस कर्मचारी पी.एच. इंगळे, सूर्यकांत भांबरे, जगदाळे आदींसह घटनास्थळ गाठून पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. 
बातम्या आणखी आहेत...