आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी माजलगाव बंद, संघटनांचा पुढाकार, शेतकऱ्याच्या देखाव्याने हृदय हेलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव येथे कर्जमाफीसाठी सामाजिक व शेतकरी संघटनेच्या वतीने बंदचे आवाहन करत रॅली काढण्यात आली. छाया : दिलीप झगडे - Divya Marathi
माजलगाव येथे कर्जमाफीसाठी सामाजिक व शेतकरी संघटनेच्या वतीने बंदचे आवाहन करत रॅली काढण्यात आली. छाया : दिलीप झगडे
माजलगाव - आत्महत्या थांबवून  शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी  द्यावी या मागणीसाठी मराठा संघटना, सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन माजलगावात शुक्रवारी बंद पुकारला. सकाळी शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक, हनुमान चौक, बीड रोड, मोंढा परिसरात फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. दिवसभर मोंढा परिसर बंद राहिल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी माजलगावात आलेल्या लोकांचे हाल झाले.  

उत्तर प्रदेशात भाजप  सत्तेवर येताच  शेतकऱ्यांना कर्जमाफी  देण्यात आली. महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर व दुष्काळामुळे  हजारो शेतकरी आज आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. उत्तर प्रदेशात भाजप सरकारने जशी कर्जमाफी दिली त्याप्रमाणे महाराष्ट्रात  राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील मराठा संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी संघटनेने माजलगाव  बंदचे आवाहन केले. सकाळी अकरा वाजता शहरातील हनुमान चौक येथून फेरी काढून  व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे  आवाहन केले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मोंढा, धारूर रोड, बीड रोड, शिवाजी चौक ते संभाजी चौकापर्यंत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. या रॅलीमध्ये मराठा आरक्षण समितीचे राजेंद्र होके पाटील, नारायण गोले, धम्मानंद साळवे, भाई लक्ष्मण सोळंके, राजेभाऊ शेजूळ, मनोज फरके, रामचंद्र डोईजड, नगरसेवक रोहन घाडगे, राजेश घोडे, शेख रशिद, सिद्धार्थ ससाणे आदीसह शेतकरी, तरुण सहभागी झाले होते.   

बंदमुळे ग्रामीण भागाला फटका  : माजलगाव शहरात शुक्रवारी कर्जमाफीसाठी मोंढा भागातील किराणा दुकाने, सराफा मार्केट, कपडा मार्केट, भांडे, फर्निचरची दुकाने, हार्डवेअर, सिंंमेट, शेती अवजारे, पाइप दुरुस्ती, खते विक्री, जनरल स्टोअर्स आदी दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ग्रामस्थांना परत गावाला जावे लागले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, शेतकऱ्याच्या देखाव्याने हृदय हेलावले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)    
 
बातम्या आणखी आहेत...