आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : तातडीने अहवाल देण्यासाठी मागासवर्गीय अायाेगास सांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा आरक्षणासंदर्भातील पुरावे व आकडेवारीची पडताळणी करून शिफारशी करण्यासाठी हा विषय राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवल्याने मराठा आरक्षणाचा निर्णय काही काळ लांबणीवर पडला आहे. मात्र दीर्घकालीन लाभासाठी तीन - चार महिन्यांचा विलंब फार नाही असे सांगत मराठा आरक्षणाचे अभ्यासक व या प्रकरणातील एक याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र आता न्यायालयाच्या सुट्यांचा फायदा घेत सरकारने आयोगाला तातडीने कालबद्ध मुदतीत अहवाल द्यायला सांगावे, अशी मागणीही केली.   

मराठा आरक्षणावरील स्थगिती उच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी वाढवली अाहे. शिवाय आरक्षणाविषयी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे विषय सोपवण्यास हरकत नसल्याचे म्हटल्याने न्यायालयाने सरकारकडून प्रतिज्ञापत्र मागितले होते. आता आरक्षणाचा विषय आयोगाकडे सोपवण्यास हरकत नसल्याचे सरकारने म्हटल्याने हा चेंडू पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टात आला. या प्रकारामुळे आरक्षणाबाबत निर्णय होण्यास विलंब होईल, अशी भीती मराठा समाजात व्यक्त होत आहे. या प्रकरणाातील एक याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे यांनी ही भीती निराधार असल्याची ग्वाही दिली. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले की, सरकारने डिसेंबर महिन्यात न्यायालयात सादर केलेल्या विस्तृत प्रतिज्ञापत्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ भक्कम पुरावे व तगडी आकडेवारी सादर केली होती. पण विरोधी याचिकाकर्त्यांचा त्यावर विश्वास नसल्याने या आकडेवारीची पडताळणी करून ते योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आहे. त्याकडे हे सोपवण्यास हरकत नाही असे सरकारचे म्हणणे आहे. आरक्षणासाठी लढणाऱ्यांचीही ही आकडेवारी व पुरावे वाया जाऊ नये यासाठी ते एकदा आयोगाच्या डोळ्याखालून जाऊ द्यावी अशीच भूमिका आहे.
 
दीर्घकालीन लाभासाठी थाेडी वाट पाहावीच
आता न्यायालयाला दीड महिन्याच्या सुट्या आहेत. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुनावणीला येणार आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ हे प्रकरण आयोगाकडे सोपवून त्यांच्याकडून तातडीने कालबद्ध मुदतीत अहवाल मागवावा, अशी मागणी सराटे यांनी केली आहे. दीर्घकालीन लाभासाठी आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा फार त्रासाची नाही, असेही ते म्हणाले.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...