आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडीवर मृतदेह नेण्याची वेळ, नगरपालिकेच्या शववाहिकेची तीन तास करावी लागली प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- बेवारस मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास  शनिवारी नगरपालिकेच्या शववाहिकेची तीन तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतरही शववाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर महर्षी वाल्मीकी संघाच्या कार्यकर्त्यांना हातगाडीवर टाकून हा मृतदेह नेला.

शनिवारी रात्री सातच्या सुमारास पन्नाशीतील गृहस्थाचा मृतदेह जुन्या नगरपालिका इमारतीसमाेर बेवारस अवस्थेत पडलेला हाेता. येणारे-जाणारे लाेक केवळ पाहून निघून जात हाेते. महर्षी वाल्मीकी संघाच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेवारस मृतदेहाबाबत आसपास चौकशी केली, मात्र त्याच्या नातेवाइकांचा पत्ता लागला नाही. त्यावर या कार्यकर्त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली. मात्र रुग्णवाहिका चालकाने मृतदेह वाहून नेण्यास नकार दिला. त्यासाठी शववाहिका मागवा, असा सल्ला दिला. मग कार्यकर्त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस त्वरित घटनास्थळी आले. नगरपालिकेकडून शववाहिका बाेलावण्यात अाली. मात्र बराच वेळ झाला तरी वाहन अालेच नाही. अखेर पाेलिसांसह महर्षी वाल्मीकी संघाच्या कार्यकर्त्यांनी चक्क मृतदेह हातगाडीवर उपजिल्हा रुग्णालयापर्यंत नेला. काही अंतरावरच रात्री अकराच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाची एक खासगी गाडी आली. तेव्हा कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
   
भविष्यात तरी उपजिल्हा रुग्णालय, पालिका रुग्णालयाच्या समन्वयातून बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी व मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी महर्षी वाल्मीकी संघाचे प्रमुख गणेश अंकुशराव यांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.     

वाहन उपलब्धच नाही  
पंढरपूर नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये शववाहिका नाही. तरीदेखील महर्षी वाल्मीकी संघाच्या कार्यकर्त्यांचा निरोप मिळाल्यानंतर माणुसकीच्या भावनेतून आपण स्वत: चार ते पाच खासगी रुग्णवाहिका, शववाहिकांना फाेन केला हाेता.
अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिका
बातम्या आणखी आहेत...