आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : मनपाने नष्ट केल्या ऐतिहासिक वास्तू, संवर्धनासाठी इतिहासप्रेमींचा व्हॉटस्अप ग्रुप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहर मलिंकबर या मुघलकालीन वास्तू शिल्पकाराने वसवले. त्याचा चारशे वर्षे झाली. त्यानिमित्ताने काही चांगले संकल्प अथवा कार्यक्रम घेण्याऐवजी महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली दहा पेक्षा जास्त ऐतिहासिक वास्तूच नष्ट करुन टाकल्याने या शहराचे जुनै वैभव संपत आहे. मनपाच्या या दादागिरीविरुध्द इतिहासप्रेमी पेटून उठले आहेत. या वास्तू येथून पुढे जतन करण्यासाठी एक कायमस्वरुपी व्हॉटअसप ग्रुप तयार केला आहे.

२०१२ पासून सुरु झाली पाडापाडी..
शहरात जसे स्मार्टसिटीचे वारे सुरू झाले तसे 2012 पासून या ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा सपाटा मनपाने लावल्याचा आरोप ज्येष्ठ इतिहासप्रेमी रफत कुरेशी यांनी केला आहे. शहराचा विकास कराच पण जुने ते सोने आहे, त्याचा उपयोग पर्यटनासाठी मनपाला करता आला असता. या जुन्या वास्तू पाडून मनपाने काय साधले? उलट शहराची ओळख नष्ट केली असे कुरेशी म्हणाले. रस्ते मोठे करताना काही मोठ्या वास्तू पाडल्या त्यात जुन्या काळातील वास्तू कलेचा उत्तम नमूना असलेली बुऱ्हानी हायस्कूलची सिटी चौकातील इमारत पाडली. खूनी दरवाजाही असाच पाडला. त्यामुळे पर्यटक येथे का येतील असा सवाल त्यांनी केला. 

या वास्तू आता कधीच दिसणार नाहीत..
क्रांती चौकातील काला चबुतरा, हिमायत बागेची पश्चिमेकडील पुरातन तटबंदी, किलेअर्कला सापडेले जुने भुयारी मार्ग आणि नहरींचे कनेक्शन, फाजलपुरा भागातील जिंवत नहर तोडून टाकली, वास्तू कलेचा उत्तम नमूना असणारा दमडी महाल, अलिकडेच पुरातन असा खास दरवाजा एका रात्रीत पाडून टाकला. 

हेरिटेज कमिटीतील सदस्यांचाही विरोध..
शहरात हेरिटेज कमिटी आहे. त्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त जिल्हाधिकारी जयंतराव देशपांडे आहेत. मनपा आयुक्त या कमिटीची बैठक घेतात पण विकासाच्या नावाखाली या कमिटीलाही प्रशासनाने जुमानले नाही. कमिटीतील ज्येष्ठ सदस्य डॉ.दुलारी कुरेशी यांनी खास गेट पाडताना खूप विरोध केला. गेट पाडण्याच्या संमती पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला तरही हे गेट पाडले.
 
 पुढील स्लाइड्सवर पाहा, संबधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...