आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदी: ६२ दिवसांनंतर, हा परिणाम जाणवत आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर देशात अभूतपूर्व परिस्थिती उद््भवली. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. नोटाबंदीच्या ६२ दिवसांनंतरही हा परिणाम जाणवत आहे.
 
वाहन विक्रीचा १६ वर्षांचा नीचांक
नोटाबंदीचा परिणाम देशातील वाहन विक्रीवर झाल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंगने (सिअॅम) म्हटलेे आहे. सिअॅमच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये वाहन विक्रीत १८.६६ टक्क्यांनी घट आली आहे. डिसेंबरमधील विक्रीचा हा गेल्या १६ वर्षांतील डिसेंबर विक्रीच्या तुलनेत नीचांक आहे. 
 
मुंबई, पुणे ७०% व्यवसायांवर परिणाम
नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई, निमिर्तीचे केंद्र पुणे आणि परिसरातील व्यवसायांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे एसबीआयच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. बांधकाम आणि रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करणाऱ्यांच्या  व्यवसायावर ७० टक्के परिणाम झाल्याचे या अहवालात नमूद आहे. 
 
व्यावसायिक आत्मविश्वास ढासळला 
जानेवारी ते मार्च २०१७ या तिमाहीतील व्यावसायिक आत्मविश्वासाचा निर्देशांक ३१ तिमाहीच्या नीचांकावर आला आहे. द डून अँड ब्रॅडस्ट्रीट (डी अँड बी) काॅम्पोझिट बिझनेस ऑप्टिमिझम निर्देशांक ६५.४ टक्क्यांवर आला आहे. जानेवारी-मार्च २०१६ या तिमाहीच्या तुलनेत यात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. केवळ पुणे-मुंबईच नव्हे तर परिसरातील व्यवसायावरही परिणाम झाला आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा फेब्रुवारीअखेर स्थिती पूर्वपदावर...