आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ने पोलिसांना दाखवले बनावट नोटेचे प्रात्यक्षिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - बनावट नोटा तयार करताना नोटाची एक बाजु व्यवस्थित आली तरी दुसरी बाजू योग्य छापून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. एक बाजूची व्यवस्थित प्रिंट आली तरी दुसरी बाजू व्यवस्थित येत नसल्याने कागदावरच जास्त खर्च झाला, अशी माहिती बनावट नोटा प्रकरणाच्या चौकशीत समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले. स्कॅनर प्रिंटरच्या साहायाने बनावट छापणाऱ्या माजीद माजीद बिस्मिल्ला खान (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याच्या पोलिस कोठडीत त्याने पोलिसांना प्रात्यक्षिक करताना हा प्रकार सांगितला. तरीही त्याने यातून पाच लाख पाच हजार तिनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या. 
 
बायजीपुऱ्यातील इंदिरानगर भागात माजीद बिस्मिल्ला खान बनावट नोटा तयार करताना गुन्हे शाखेने त्याला १९ मे रोजी अटक केली. त्यावेळी प्रिंटर, स्कॅनर सह कागदाचे गठ्ठे पोलिसांनी हस्तगत केले होते. यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळवाडी राजा येथील एका तरुणाला माजिदवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दहावी पर्यंत शिकलेला असतानाही माजिद याने बनावट नोटा छापण्याचे तंत्र शिकून लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या. परंतु नेमका तो केवळ स्कॅनर प्रिंटरच्या साहायाने हुबेहूब नोटा कसे तयार करत होता, हे तपास यंत्रणेला समजून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याला समोर प्रयोग करून दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्याने हा सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्याच्य या बनावट नोटाच्या कल्पनेमागे नेमके कोण आहे, हे मात्र अद्याप समोर येऊ शकलेले नाही. 

लाखो रुपयांच्या नोटा, मात्र कागदावरच जास्त खर्च 
माजिद केवळ दहावी पास आहे. बनावट नोटा छापताना तो स्कॅनरमधून सुरुवातीला एक मूळ नोट (ओरीजनल) स्कॅन करून घेत असे. त्यानंतर प्रिंटरमधून त्याच्या प्रिंट काढत होता. परंतु हे करताना समोरील बाजू स्कॅन केल्यावर नोटांची मागील प्रिंट तंतोतंत जुळवण्यात त्याला मोठ्या अडचणी आल्याचे त्याने सांगितले. यासाठी नोटा छापताना पहिली बाजू व्यवस्थित सेट झाल्यावर दुसरी बाजू सुध्दा व्यवस्थित सेट झाली का, हे तपासून पाहण्यासाठी तो आधी साधी प्रिंट (झेरॉक्स) काढून पाहत असे. जमवाजमव करण्यातच कागद खर्च झाला. छपाई व्यवस्थित आल्यास तो नोट फाडून फेकून देत असे. स्कॅन होऊन दोन्ही बाजू तंतोतंत सेट झाल्याचे निश्चित होताच तो प्रिंट काढून शंभर, दोन हजार पाचशे रुपयांच्या नोटा काळजीपूर्वक कापत होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...