आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागासह जिल्हा, तालुका पातळीवर महिला कक्ष- विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जनतेच्या सोयी-सुविधांबाबत शासन संवेदनशील आहे. म्हणूनच राज्यात माहिती आयुक्ताप्रमाणे सेवा हमी आयुक्त यांची नियुक्ती केली आहे. सेवा हमी कायदा हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कायदा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व विभागीय कार्यालयांत तसेच जिल्हा, तालुका पातळीवरील कार्यालयांत महिला कक्ष स्थापन करावयाच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या. 
 
मंगळवारी (१४ मार्च) झालेल्या विभागीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेत संबंधितांना सूचनाही दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात १३ तक्रारी दाखल झाल्या. सर्व अर्जांवर सुनावणीही झाली.
 
मागील प्रलंबित प्रकरणे ३१ मार्चपर्यंत निकाली काढावीत, तसेच विभागीय लोकशाहीदिनी जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे निर्देशही डॉ. भापकर यांनी दिले.
 
या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेंद्र हरपाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता रेणुकादास चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम, शिक्षण उपसंचालक देविदास बोरसे, विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, जलसंपदा विभागाचे सहायक मुख्य अभियंता पी.एस.तांबी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी विभागीय महिला लोकशाही दिनाचेही कामकाज झाले. 

सर्व कार्यालये 1 मे पर्यंत स्वच्छ करा 
स्वच्छ मराठवाडा योजने अंतर्गत मेपर्यंत तालुका तसेच जिल्हापातळीवरील सर्व कार्यालये स्वच्छ करावयाची आहेत. आगामी दोन महिन्यांत मराठवाड्यातील प्रत्येक गाव टंचाईमुक्त व्हावे, यासाठी जलयुक्त शिवार ही योजना अधिक गतिमानतेने राबवायची आहे. तसेच दशकोटी वृक्षलागवड या योजनेअंतर्गत विभागातील प्रत्येक कार्यालयाने परिसरात वृक्ष लागवड करून या रोपांचे संगोपन करावे, असेही विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी या वेळी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...