आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमीची कामे टाळणाऱ्या सरपंचांना अपात्र ठरवणार, विभागीय आयुक्तांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - मराठवाड्यातील ग्रामीण भागात मजुरांना काम हवे असताना ग्रामपंचायती रोहयो कामासाठीचा  निधी खर्च करत नसतील, कामे टाळत असतील  तर थेट सरपंचांना अपात्र ठरवू, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिला.  आपण गावांची झडती घेणार असल्याचे ते म्हणाले.

मंगळवारी जिल्हास्तरीय रोहयो कार्यशाळा झाली. या वेळी त्यांनी हा इशारा दिला. मराठवाड्यात सर्व ग्रामपंचायतींत ८, ९ मार्च रोजी रोहयो कामांसाठी ग्रामसभा झाल्या. त्याचे पंचायत, तहसील, जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल भंपक, बनावट असल्याचे ते म्हणाले.
 
लाभार्थींबाबत ७५टक्के अधिकारीच अनभिज्ञ :
भापकरांनी रोहयो लाभार्थी कोण होऊ शकतो, असा प्रश्न विचारला. तेव्हा  ७५ टक्के अधिकारी नेमकी माहिती नाही, असे म्हणाले. ज्यांना लाभार्थीच माहिती नाही त्यांच्याकडेच रोहयोचे काम असणे हे दुर्दैव असल्याचे भापकर म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...