आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 263 दारू दुकाने मतदान घेऊन ‘लोळवणार’; आमदार इम्तियाज जलील यांचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील दारू दुकानांविरुद्ध आमदार इम्तियाज जलील यांनी जोरदार मोहीम उघडली असून वर्षभरात कायदेशीर मार्गाने २६३ दारूची दुकाने बंद करण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते नागरिकांच्या मदतीने महिनाभरात वॉर्डनिहाय दारूच्या दुकानांच्या याद्या तयार करून बाटली आडवी करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवणार आहेत. कायदेशीर मार्गाने दारू दुकाने बंद करणे अनेकांना दहा वर्षांत जमले नाही ते वर्षभरात करून दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

दारूविरोधी जाहीर मोहिमेंतर्गत मंगळवारी तापडिया नाट्य मंदिरात ‘नशामुक्त औरंगाबाद’ सभा झाली. त्यास एमआयएमच्या नगरसेविका संगीता वाघोले, सरिता बोर्डे, सायरा बानो, शेख समिना आदींची उपस्थिती होती. इम्तियाज म्हणाले, दारुड्या पुरुषामुळे घरातील महिला, मुलांचे आयुष्य उद‌्ध्वस्त होते. हे टाळण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने ही मोहिम सुरू केली आहे. हा राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यक्रम आहे. सुत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. 

शहरातील स्थिती अशी 
१९  देशीशॉप 
२९ वाइनशॉप 
२१५ परमिटरूम 
- हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीचे हे आकडे अाहेत. 

वर्षभरात दुकाने बंद : अा. इम्तियाज 
आमदार इम्तियाज म्हणाले, महिनाभरात शहरातील दारू दुकानांची यादी तयार केली जाईल. मग त्या- त्या भागातील नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. त्यानंतर उत्पादन शुल्क महसूलच्या मदतीने ते दुकान बंद केले जाईल. या बाबत प्रबोधनासाठी लवकरच भव्य मानवी साखळी तयार केली जाणार आहे. आजवर कायद्याने शहरात एकही दुकान बंद झालेले नाही. जे १० वर्षांत नाही जमले ते वर्षभरात करून दाखवू. 

असे बंद करता येते दारूचे दुकान 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी दारू दुकाने बंद करण्याचा कायदेशीर मार्ग सांगितला. तो असा : बेकायदा दारू विक्रेत्यांना दोन वेळेस हजार रुपयांचा दंड ठोठावता येतो. तरी त्याने विक्री थांबवली नाही तर त्यास हद्दपार करता येते. कायदेशीर दारूची दुकाने २००८ च्या कायद्यान्वये बंद पाडता येतात. यासाठी त्या भागातील किमान २५ टक्के नागरिकांनी दुकानाला, बिअरबारला विरोध असल्याच्या स्वाक्षऱ्यांचे निवदेन तयार केले पाहिजे. 

पण या होतात चुका : 
१) ज्या वॉर्डात दुकान तेथील रहिवाशाची सही नसते. 
२) सही असली तर त्याचे नाव मतदार यादीत नसते. 
३) त्याने निवेदनावर केलेली सही आणि प्रत्यक्ष मतदानातील सही जुळत नाही. 
४) ऐनवेळी काहीजण सही माझी नसल्याचे सांगतात. 

उपाय काय 
- वाॅर्डात २५ ऐवजी ४० टक्के नागरिकांच्या सह्या जमा करा.

महिलांच्या करुण कहाण्यांनी सारेच भावनाविवश
१९९३ मध्येविवाह झाला. १५ वर्षांनंतर पतीला दारूचे व्यसन लागले. यातच त्यांचा मृत्यू झाला. वी, १० वी आणि ११ वीत शिकणाऱ्या तीन मुली आहेत. मातीकाम आणि धुणीभांडी करून घरगाडा चालवतेय. तिघींना शिक्षण देतेय. 
- संगीता शिंदे 

मुलाने जेवायलामागताच नशेतील पतीने साडेचार वर्षांच्या मुलाला जमिनीवर आदळून मारले. आता घरकाम करून दोन मुलांचा सांभाळ करतेय.
- साहिल अंजूम 

देशीच्या दुकानवाल्यानेअंध मुलाला बळजबरीने कामावर ठेवण्याचा हट्ट धरला. यास विराेध करताच मारहाण केली. पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी परत मुलाला मारले. 
- अनिता उबाळे 

दारूच्या व्यसनामुळे२०१४ पासून पती आजारी होता. २०१६ मध्ये निधन झाले. ब्यूटी पार्लरमध्ये काम करून मुले आणि मुलींचा सांभाळ करतेय. 
- शमीम झेबा
बातम्या आणखी आहेत...