आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापती पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अंबडमधील घटना, दरोड्याचा प्रयत्न असल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड-  बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अंबड शहरातील इंदाणी कॉलनी परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. डोक्यात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. दरोड्याच्या प्रयत्नातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मात्र नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. 
 
सभापती सतीश होंडे हे सोमवारी सांडेगाव येथील शेतावर गेलेले होते. त्यामुळे सुमित्रा होंडे या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी चार वाजता त्यांचा दीर कैलास नानासाहेब  हाेंडे शाळेतून घरी आला. त्याने दरवाजा वाजवला, मात्र आतून  प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यास सुमित्रा जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना आवाज दिला व जखमी सुमित्रा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना तत्काळ जालना येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्य्ू झाला. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने, पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, उपनिरीक्षक विजय जाधव हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांना घरामध्ये  रिव्हॉल्व्हर दिसून आले व समोरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले अाढळून आले.  सुमित्रा होंडे यांच्या डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला आहे. मात्र नेमके कारण समजू शकले नाही. हा घातपात आहे किंवा अन्य काही, याचा आम्ही तपास करतो आहोत. याचा तपास लवकरच लावण्यात यश येईल, असे डीवायएसपी रमेश सोनुने यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...