आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे राष्ट्रीय महामार्गावर पावणेदोन किलोमीटरमध्ये 139 धोकादायक झाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हातनूरजवळ पावणेदोन किमी मार्गावर धोकादायक झाडांमुळे अपघाताची शक्यता आहे. - Divya Marathi
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हातनूरजवळ पावणेदोन किमी मार्गावर धोकादायक झाडांमुळे अपघाताची शक्यता आहे.
हतनूर  - औरंगाबाद - धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ वरील कन्नड तालुक्यातील विठ्ठलपूर शिवारातील कापूस जिनिंग ते कमान नाला या पावणेदोन किलोमीटर अंतरात शेवरी, लिंब, काटेरी बाभूळ, सुबाभूळ अशा प्रकारच्या १३९ झाडे रोडवर अतिप्रमाणात वाकलेले आहेत. यामुळे हे झाडे रोडवर पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद मार्गे उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा मुख्य मार्ग असून त्यामुळे औरंगाबाद येथील उद्योग नगरीचा प्रामुख्याने जीवन वाहिनीच हा मार्ग आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील अत्यंत आवश्यक आहे. या मार्गावर कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य, पितळखाेरा लेणी, अंतुर किल्ला, पाटणादेवी, शिवना- टाकळी प्रकल्प तसेच पुढे  वेरूळ लेणी, म्हैसमाळ, दौलताबाद किल्ला असे अनेक पर्यटन स्थळे या मार्गावर आहेत. यामुळे औद्योगिक व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या या मार्गावर अत्यंत अशी धोकादायक परिस्थितीत ही झाडे तग धरून आहे.  या झाडांखालून मोठे ट्रक गेल्यास ही झाडे हलतात, कंटेनरला ही झाडे घासतात, एखाद्या वेळेस सोसाट्याचा वारा आला तर  झाडे रोडवर पडतील व त्यामुळे ही झाडे खाली पडून एखाद्या वेळेस मोठा अपघात घडू शकतो.
बातम्या आणखी आहेत...