आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये दारूबंदीसाठी तरुणांची ‘गांधीगिरी’, दारू पिण्यास आलेल्या मद्यपींना केले दूध वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - ग्रामीण भागातील तळीराम शहरात दारू पिण्यासाठी येतात व रस्त्यावर कोठेही दारू पिऊन धिंगाणा घालतात. यामुळे  शुक्रवारी  शहरातील काही तरुणांनी येथील दारूच्या दुकानासमोर तळीरामांना दूध, ताक, दही वाटप करून गांधीगिरी स्टाइलने आंदोलन केले.
 
पैठण  येथील चौकाचौकांत दारूची दुकाने आहेत. शहरातील दारू दुकाने हद्दपार करा, अशा  घोषणा देत तरुणांनी शिवाजी महाराज चौकातून बसस्थानक परिसरापर्यंत मोर्चा काढला. दारू पिणाऱ्यांना दुकानासमोरच दूध, ताक, दही पिण्यासाठी दिले. यापुढे आणखी आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे दारूविरोधी कृती  समितीचे कपिल पहिलवान यांनी सांगितले.  दारूविरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी भरउन्हात शेकडो तरुणांनी  शहरातील सर्वच देशी-विदेशी दारूच्या दुकानावरील  तळीरामांना दूध, ताक, दही वाटप  केले. यात  संतोष गोबरे, अतीश गायकवाड, विजय सुते, शुभम लोहारे, समीर शुक्ल, रवींद्र जोशी, सुमीत मगरे, अविनाश लिंबगावकर, कपिल कावसनकर, संतोष शिंगटे, प्रीतम आडसूल, अमोल भागवत, राम कर्डिले, विजय आचार्य, सुनील आडसूल यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...