आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने लढू : अोवेसी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत बोलताना खा. असदुद्दीन ओवेसी. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत बोलताना खा. असदुद्दीन ओवेसी.
औरंगाबाद - एमआयएम संपूर्ण ताकदीने जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही आमचे उमेदवार राहतील, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 
ओवेसी म्हणाले की, निवडणुकीत जात, धर्म, पंथ, भाषा अाणि धर्माच्या आधारे मत मागणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. परंतु याचबरोबर हिंदुत्वाच्या विषयावरही सुनावणी झाली असती तर बरे झाले असते. पंतप्रधान कॅशलेसबाबत बाेलत आहेत. श्रीमंतांना दारू, सिगारेटसाठीही क्रेडिट कार्डची सक्ती करा. गरिबांना कॅशलेसबाबत का वारंवार सांगितले जाते? पेट्रोल भरताना मोबाइलचा वापर करू नये, अशी सूचना केलेली असते. मग पेटीएमने पेट्रोल-डिझेल कसे भरायचे? ३१ डिसेंबरला पंतप्रधानांनी महिलांना डिलिव्हरीच्या वेळी सहा हजार रुपये देऊ असे सांगितले. परंतु हा निर्णय तर २०१३ मध्ये नॅशनल बोर्डाने घेतला आहे. भाजपला सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली. त्यांनी किती घरे बांधली, याचे उत्तर आधी द्यावे. शिवाजी महाराजांचे स्मारक बनवले जात आहे, चांगली गोष्ट आहे. शिवाजी महाराज आणि शेतकऱ्यांचे काय नाते होते हे सरकारला माहीत नसावे. म्हणूनच एक हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असेही ओवेसी म्हणाले. या वेळी आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, मौलाना महेफूज उर्ररहेमान, नासेर सिद्दिकी, अन्वर कादरी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...