आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे वाटप निर्बंधासाठी 768 उमेदवारांवर सोशल स्ट्रिंजरची ‘नजर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट गणासाठी ७६८ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याच्या आष्टी आणि नळणी वाडी या दोन ठिकाणी घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिस प्रशासन आणि निवडणूक विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. विविध घटनांची माहिती देणारे ५३४ सोशल स्ट्रिंजर आता पोलिसांनी उमेदवार गावपातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जाऊन सोशल मीडियाद्वारे माहिती घेऊन ती पोलिसांना पाठवत आहेत. 

दहशतवादी कृत्य, महिला, मुलींची छेड यासोबतच गावपातळीवर गुन्हे घडू नयेत याअनुषंगाने ग्रामसंरक्षण दल, पोलिस पाटील यांची नियुक्त गावपातळीवर केली आहे. सध्या सोशल मीडियाचा प्रत्येक जण वापर करत आहेत. सोशल मीडियावरूनही अनेक जण इतर समाजाविषयी विघातक लिखाण करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा घटनांवर आळ्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातून सोशल मीडिया स्ट्रिंजर म्हणून गुप्त यंत्रणा स्थापन केली आहे. या यंत्रणेमुळे अनेक गुन्हेगारांवर आळा बसत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील नळनीवाडी परतूर तालुक्यातील आष्टी या ठिकाणी पैसे दारू वाटप करताना काही जणांना अटक झाली आहे. मतदानाच्या दिवशी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने स्थापन केलेल्या गोपनीय सोशल स्ट्रिंजरची मदत घेतली जात आहे. आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी अॅपही स्थापन केले आहे. अॅपचा वापर अवघड आहे. आज मतदान असल्यामुळे पोलिस, निवडणूक विभागाने गावपातळीवर पोलिस मित्र, सोशल स्ट्रिंजर उमेदवारांची गोपनीय माहिती घेत आहेत. 

सोशलचाही वापर करा 
- काही गैरकृत्य आढल्यास पोलिस, गुन्हे शाखा यांचे व्हॉट्सअॅप नंबर दिलेले आहेत. अॅपही तयार करण्यात आले आहेत. मोबाइलवरून कुठे गैरकृत्य होत असल्यास माहिती द्यावी.
राहुल माकणीकर, सहायक पोलिस अधीक्षक, जालना. 

गोपनीय सोशल स्ट्रिंजरची निवड 
गोपनीय पद्धतीने टीम तयार केली आहे. सोशल स्ट्रिंजरची माहिती फार कमी जणांना आहे. याचा वापर वाढवून इतर गुन्हेगारीही कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. निवडणुकीच्या बाबत बरीचशी माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे. ज्योतिप्रियासिंह, पोलिस अधीक्षक, जालना. 

या गुन्ह्यांचीही दिली जाते माहिती 
महिलांची छेड, शासकीय मालमत्तेचे नुकसान, चोरी, दहशतवादी कृत्ये, धार्मिक तेढ यासारख्या घटनांचीही माहिती या स्ट्रिंजरकडून दिली जात आहे. पाेलिस विभागातील विशेष पोलिसांकडून त्यांना गोपनीय ठिकाणीच प्रशिक्षण दिले जाते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रिंजर चांगले काम करत आहेत. यामुळे पोलिसांवरील ताण थोड्याफार प्रमाणात का होईना कमी झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...