आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननीकडे उमेदवारांचे लक्ष, जि.प,पं. समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात झाली गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवटच्या दिवशी अर्ज भरताना विविध पक्षांचे उमेदवार दिसत आहेत. - Divya Marathi
शेवटच्या दिवशी अर्ज भरताना विविध पक्षांचे उमेदवार दिसत आहेत.
जालना - उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात जिल्हा परिषद गट, पंचायत समितीगणातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारासह कार्यकर्ते समर्थकांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी गर्दी केली होती. या उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यात प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, गुरुवारी अर्जांची छाननी होणार असल्यामुळे उमेदवारांचे लक्ष लागून आहे. 
 
जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या ५६ गटासाठी तर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या ११२ गणासाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषदे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसापासून इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना-भाजप यांची युती तुटल्याने दोन्ही पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे. सर्व पक्षीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुंक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. 

पक्षाकडून तिकिट आपल्याला भेटणार असल्याचे समजत उमेदवारांनी जिल्हा परिषद गट गणामध्ये उमेदवारांच्या भेटी गाठी सुरु केल्या आहेत. अनेक उमेदवारांनी गट गणांचे दोन ते तीन वेळेस दौरे देखील गेले आहेत. महिलांसाठी राखीव गट गणामध्ये पतीकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. मुलाखती झाल्यापासून इच्छूकांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली.. तिकिट आपल्याच मिळावे यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २७ जानेवारी पासून सुरूवात झाली होती. एक फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख होती. पहिल्या दोन दिवसात कमी अर्ज आले होते. परंतू शेवटच्या टप्प्यात संख्या वाढली होती. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, अर्जांची आकडेवारी आणि तालुका निहाय अर्ज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...