आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : नेकनूर येथे यादीत मृतांची नावे, बेलखंडी, डोंगरकिन्हीत यंत्र बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड तालुक्यातील पेंडगाव प्राथमिक शाळेत मतदानासाठी महिला -पुरूषांच्या रांगा लागल्या होत्या. - Divya Marathi
बीड तालुक्यातील पेंडगाव प्राथमिक शाळेत मतदानासाठी महिला -पुरूषांच्या रांगा लागल्या होत्या.
बीडजिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गुरूवारी बीड तालुक्यातील बेलखंडीत मतदान यंत्र बंद पडले तर खेर्डेवाडीत बीप आवाजच येत नसल्याने यंत्र बदलावे लागले. केज तालुक्यातील नाव्होलीत उमेदवाराच्या नावासमोरील लाईट लागत नसल्याने यंत्र बदलावे लागले. तर डाेंगरकिन्ही येथील मतदान केंद्रावर कंट्राेल युनिटचा अचानक डिस्पले बंद पडला. हिवरा गोवर्धन येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला. नेकनूर येथे मात्र मतदार यादीत तीनशे मयतांची नावे दिसुन आल्याने खळबळ उडाली. 
 
विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी -माजी सभापतींनी केले उत्साहात मतदान 
गुरूवारी जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद गट १२० पंचायत समितीच्या गणात सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवला परंतु दुपारी दोन नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा सुरू दिसुन आला. बीड तालुक्यातील बेलखंडी पाटाेदा येथील मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू हाेण्याच्या अधी तपासणी दरम्यान मतदान यंत्र सुरू झाले नाही. तेंव्हा केंद्र प्रमुखांनी बीडच्या तहसीलदार छाया पवार यांना मािहती दिली. त्यांनतर १५ मिनिटात मतदान यंत्राचे केबल लावण्यासंदर्भात त्यांनी सांगीतले. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजता मतदानाला सुरूवात झाली. तर खर्डेवाडी येथील मतदान केंद्रावर पहिल्या टप्प्यात मतदान केल्यानंतर ‘बीप’ अावाज येत नसल्याने मतदान यंत्र बदलण्याची मागणी करण्यात अाली. येथे २० मिनिटांमध्ये नवीन यंत्र बदलून देण्यात अाले. केज तालुक्यातील नाव्हाेली येथील मतदान यंत्रामधील एका उमेदवारांच्या नावासमाेरील लाईट लागत नव्हती. परंतु मतदान झाल्याची अाकडेवारी तपासणी दरम्यान दिसून येत हाेती तेंव्हा केंद्राध्यक्षांनी दुसरे मतदान यंत्र बसवले. पाटाेदा तालुक्यातील डाेंगरकिन्ही येथील मतदान केंद्रावर कंट्राेल युनिटचा अचानक डिस्पले बंद पडला. तहसील प्रशासनाने काही मिनिटामध्ये पर्यायी कंट्राेल युनिट उपलब्ध करुन मतदान प्रक्रिया सुरू ठेवली. 

धारूर तालुक्यातील सकाळी जायभायवाडी येथे जिल्हा परिषद निवडनुकीचे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाला होता. तेंव्हा तात्काळ दुरुस्ती नंतर मशीन सुरू झाल्या .चारदरी येथे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली . परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता.काही वेळाने हे यंत्र दुरुस्त करण्यात आले.त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरुळीत सुरु झाली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा,  मतदान करताना उमेदवार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...