आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपुरवठा विहिरीलगत सिमेंट बंधाऱ्याच्या कामास झाला प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - शासकीय लक्ष्मी गायरान जमिनीतील वाळूज ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीलगत जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याच्या कामास मंगळवारी प्रारंभ करण्यात आला आहे. या कामावर सुुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यात सिमेंट बंधाऱ्यासह नाला खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. हे काम महिनाभरात पूर्णत्वाकडे नेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता श्रीधर अलिंग अप्पा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. या बंधाऱ्यामुळे गेल्या चार वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या वाळूजच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईवर मात करता येणे शक्य होणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून होणाऱ्या अत्यल्प पावसामुळे वाळूज परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. परिसरातील जलस्रोत आणि पाणी साठे आटत चालले आहेत. वाळूज गावाला पावसाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे शासकीय टँकरवर वाळूज गावाची तहान भागवणे भाग पडले. बाया-बापड्यांना दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. टेंभापुरी मध्यम प्रकल्पातही जेमतेम पाणी साठा आहे. तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या वाळूज येथील पाणीपुरवठा विहिरीलगत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खोलीकरण सिमेंट बंधारा बांधण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्तावित करण्यात आले होते. ग्रामपंचायतीने हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे दिला होता. तेव्हा त्यास सिंचन विभागाने मंजुरी दिली होती.

पाणीपुरवठ्याच्याविहिरीलगत बंधारा : शासकीयलक्ष्मी गायरान जमिनीवर उत्तरेस ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर आहे. या विहिरीलगत उत्तर-दक्षिण असा ओढा वाहतो. या ओढ्यावर पूर्व-पश्चिम असा सिमेंट बंधारा बांधला जात आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीपासून उत्तरेस अंदाजे १०० फूट अंतरावर हा बंधारा असणार आहे. त्यासाठी विशाल गायकवाड तसेच अंकुश गायकवाड यांच्या शेतीतील ओढ्यात जेसीबी यंत्राच्या साह्याने खोदकाम करण्यात आले आहे. सिमेंट बंधाऱ्याच्या कामासोबतच ओढ्याच्या खोलीकरणाचे कामही प्रस्तावित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विहिरीसोबतच परिसरातील शेतमळ्यांतील विहिरींच्याही पाणी पातळीत वाढ होणार आहे.

सिमेंट बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यामुळे तसेच ओढ्याच्या खोलीकरणामुळे सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. लगतची पाणीपुरवठा विहीर तसेच भूगर्भातील पाणी पातळीच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ५० वर शेतमळ्यांतील विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होणार आहे. या सिमेंट बंधारा बांधकाम ओढ्याच्या खोलीकरणाच्या संभाव्य फायद्याचे गणित कळल्यामुळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.

पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार
^पाणीपुरवठा विहिरीच्या पाणीपातळीने तळ गाठला होता; परंतु विहिरीचे खोलीकरण केल्यामुळे काहीसा फायदा झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधारा बांधकामामुळे तसेच ओढ्याच्या खोलीकरणामुळे सिंचन क्षमतेत नक्कीच वाढ होणार आहे. त्यातून गावाला फायदा होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार अाहे. सुभाषतुपे, सरपंच, वाळूज ग्रामपंचायत

^वाळूजच्या पाणीपुरवठा विहिरीलगत सिमेंट बंधारा बांधकामास शनिवारी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यावर १० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यात ओढ्याचे खोलीकरण करून सिंचन क्षमता वाढवण्यात येणार आहे. श्रीधरअलिंग अप्पा , कनिष्ठ अभियंता, सिंचन विभाग, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...