आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : पाठबळाची गरज भासल्याने पुन्हा जिल्हाध्यक्षपद घेतल्याची चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड  - विविध प्रकरणांच्या माध्यमातून विरोधकांनी अडचणीत आणल्याने आमदार अब्दुल सत्तार यांना काँग्रेसच्या पाठबळाची गरज भासल्याने त्यांनी  जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्याची चर्चा आहे.    
 
सिल्लोड तालुक्यातील आ.सत्तार यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर चौफेर हल्ला चढविण्यास सुरुवात केली असून, यात सत्ताधारी भाजपाचे कार्यकर्ते आघाडीवर असल्याने सत्तार अडचणीत आले आहेत. सरकार दरबारी करण्यात आलेल्या तक्रारींमुळे अडचणीत आल्याने यातून मार्ग काढण्यासाठी पक्षाची ढाल वापरण्याचा प्रयत्न आ. सत्तार यांच्याकडून करण्यात येत आहे. दबावाचे राजकारण खेळण्याचे त्यांचे सुरुवातीपासूनचे तंत्र असून, स्वपक्षीय नेते व विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी ते कायम विरोधी पक्षातील नेत्यांच्या संबंधांचा वापर करीत आले आहेत. परंतु राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांचे हे तंत्र यशस्वी होताना दिसत नाही. याच तंत्राचा वापर करीत त्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये जिल्ह्यात झालेल्या  नगर परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी  नगर परिषद निवडणुकांसाठी सहकार्य केले नसल्याचा आरोप करीत  जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याशिवाय जिल्हाध्यक्षपद स्वीकारणार नाही असे त्यांनी तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. परंतु अवघ्या नऊ महिन्यांमध्ये असे काय घडले की आ.सत्तार यांना प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्याची मागणी करावी लागली याची  चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. नगर परिषद निवडणुकांच्या काळात काँग्रेसचे नेते प्रचाराला आले नाहीत, असा आरोप करणाऱ्या आ.सत्तारांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तालुक्यात  एकाही नेत्याला बोलाविले नव्हते. एकहाती निवडणूक लढवून पक्षश्रेष्ठींना आव्हान देण्याचाच प्रयत्न  होता. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात भाजपाला यश मिळाले, पंचायत समिती ताब्यात आली. या विजयाने उत्साहित कार्यकर्ते यांनी आ.सत्तार यांच्याविरोधात रान पेटविण्यास सुरुवात केलीली आहे. 
 
दोन्ही ठिकाणी आमदार सत्तार नव्हते
 काँग्रेस विरोधात बंड करून  बाहेर पडल्यानंतर पक्षांतर्गत विरोध पत्करून कै.शंकरराव चव्हाण यांनी सिल्लोड येथे सत्तार यांना २००० मध्ये काँग्रेसमध्ये  प्रवेश दिला होता. त्यानंतर सोळा वर्षांनी पुन्हा पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बंडाचा शड्डू त्यांनी ठोकला. त्यावेळी पित्याने तर या वेळी पुत्राने पुन्हा काम करण्याची संधी दिली. आ.अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची माळ पडल्यानंतर औरंगाबाद येथे गांधी भवनात  कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा पहिला कार्यक्रम झाला. कार्यक्रम नामेदव पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. आ.सत्तार मात्र औरंगाबाद व सिल्लोड या दोन्ही ठिकाणी नव्हते.
बातम्या आणखी आहेत...