आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी एक्स्पोचे शनिवार, रविवारी आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘दिव्य मराठी’ वंश बिल्डकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांना विविध गृहप्रकल्पांची माहिती एका छताखाली उपलब्ध व्हावी यासाठी ‘दिव्य मराठी’ रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. १८ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते रात्री या वेळेत जुने बिग बाझार कॉम्प्लेक्स, आकाशवाणी चौक, जालना रोड येथे होणाऱ्या या एक्स्पोत घर खरेदीसाठी नागरिकांना विविध पर्याय मिळतील. घराची नोंदणी केल्यानंतर काही दिवसांतच घराचा ताबा मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
आगामी महाशिवरात्री, गुढीपाडवा या सणांच्या मुहूर्तावर नागरिक घरांची खरेदी करण्यावर भर देतात. शहरातील घरांच्या किमती स्थिर असून नागरिकांना घर खरेदीसाठी आता अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठीच शहर आणि परिसरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक्स्पोत भेट द्यायला आलेल्या नागरिकांना प्रकल्प स्थळाची पाहणी करता येईल. एक्स्पोचा मुख्य प्रायोजक वंश बिल्डकॉन आहे. यात युनिक डेव्हलपर्स (ग्लोरिया), के. के. व्हेंचर (ऑरा व्हिलेलिया), नागपाल ग्रुप , ग्रॅड कल्याण (कल्याण ग्रुप), स्टेट बँक ऑफ इंडिया, फेथ बिल्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., विकास डेव्हलपर्स, अनिल अग्रहारकर इंजिनिअर्स डेव्हलपर्स, वास्तुश्री सैनिक विहार कांचनवाडी, दिशा ग्रुप आदींचा सहभाग आहे. विविध वित्तीय संस्थांद्वारे घर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कर्जासंबंधीची माहिती दिली जाईल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, फोटो..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...