आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कोटी खर्चातून सर्वधर्मीयांचे एकात्म ‘दर्शन’, दिव्य मराठीच्या पाठपुराव्याला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जातीय राजकारणामुळे नेहमीच दंगली घडतात. यातून समाजा-समाजात तेढ निर्माण होऊन कटूता वाढते. दरम्यान, जालनेकरांना एकमेकांच्या धर्माची माहिती व्हावी, या उद्देशाने दोन कोटी रुपये खर्चून २० हेक्टर क्षेत्रावर १३ हजार झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे उद्यानात हिंदू, मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन धर्माचे प्रतिक असलेले बोर्ड चारही बाजूंनी लावून एकमेकांच्या समाजाची माहिती देऊन जातीय सलोखा निर्माण केल्या जात आहे. या उद्यानाचे काम समाजा-समाजात एकात्मता निर्माण करणाऱ्या उद्यानाचे काम प्रगतीपथावर असून, आगामी चार वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.
 
बियाणाची पंढरी, औद्योगिक वसाहती, शैक्षणिक सुविधा चांगल्या असल्यामुळे ‘जालना सोन्याचा पाळणा’ अशी या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. शहराला चारही बाजूंनी वन विभागाचा वेढा असल्यामुळे जालना हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. परंतू, जालनेकरांना पिकनीकसाठी एकही चांगले उद्यान नाही. यामुळे जालनेकरांना औरंगाबाद, पुणे सारख्या ठिकाणी जाऊन विरंगुळा करावा लागतो. एकोणावीस लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात विविध जाती धर्माचे लोक आहेत. परंतू, एकमेकांचा धर्म समजून घेतलेल्या काही नागरिकांमुळे जालन्यात कधी-कधी धार्मिक वादातून जातीय तेढ निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. जुन्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अजूनच कटूता निर्माण होण्याची शक्यता असते. दरम्यान, जालना शहराच्या देऊळगावराजा रोड जवळ मोठ्या प्रमाणात वन उद्यान आहे. या उद्यानाचा पिकनीक तसेच जालन्यातील तरुण, वयोवृध्द, बालके यांच्यासाठी उद्यान उभारल्या जात आहे. मोतीबागेव्यतिरिक्त एकही उद्यान नसल्याने जालनेकरांची परवड होत आहे. मोतीबागेत अनेक सुविधांची कमतरता असल्याने या ठिकाणी जाणारांची संख्या कमी आहे. यामुळे सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेऊन स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान या नावाने उद्यानाचे काम सुरु आहे. २० हेक्टर परिसरात साकारत असलेले हे उद्यान जालन्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देणारे ठरत आहे.
 
या उद्यानाच्या चारही बाजूंनी कंपाउंड करुन घेतले आहे. चारही बाजूंनी हा परिसर वृक्षाच्छादीत करण्याच्या दृष्टीने खड्डे खोदण्यात आले आहेत. पाणी मुरण्यासाठी चारही बाजूंनी चार केला आहे. जेणेकरुन पाणी चांगल्या प्रकारे मुरल्या जाते. यामुळे आताही या परिसरातील बोअर, विहीरींना मुबलक पाणी साठा आहे. सध्या सकाळी जॉगींगसाठी अनेक तरुण, तरुणी, वयोवृध्द या परिसरात येत आहेत. यामुळे सर्व जाती, धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात आहे. उद्यानाचे काम होण्यासाठी सामाजिक वनिकरणचे संचालक शिवाजी नारनवर, सहाय्यक संचालक के. बी. पांडे, लागवड अधिकारी वृषाली तांबे यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 
 
काम प्रगतिपथावर 
- वृक्षवल्ली आम्हासोयरे या उक्तीप्रमाणे उद्यानाचे काम सुरु आहे. तसेच उद्यानाच्या माध्यमातून विविध जाती, धर्मात जातीय सलोखा निर्माण केला जात आहे. वृषालीतांबे, लागवड अधिकारी, सामाजिक वनिकरण, जालना.
 
ही राहणार वन 
२० हेक्टरच्या वनक्षेत्रात हिंदू, मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, पारसी या प्रकारच्या वनासोबतच नवगृह वनात विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती, औषधी उद्यान, गुलाब वन, राशी वन, शिव पंचायत वन, दशमुळ वन या प्रकारची वन राहणार आहेत. या वन प्रकारातून विविध प्रकारची माहिती दिली जात आहे 
 
ठिबकने पाणी 
उद्यानातील झाड, फुलांच्या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक करण्यात आले आहे. यामुळे ही झाडे जगविण्यासाठी कमी पाणी लागत आहे. झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रत्येकजण परिश्रम घेत आहे. 

ही लावण्यात आली झाडे 
सध्या उद्यानात पिंपळ, वड, कडूनिंब, जाम, चिकू, सिरस, बाभूळ, बांबू यासह उद्यानात फुलणारे विविध प्रकारचे फुले येणारी झाडे लावण्यात आली आहेत. एक वर्षात आतापर्यंत दहा टक्के काम झाले आहे. येत्या चार वर्षात काम करावे लागणार आहे. 
 
उद्यानाची वैशिष्टये 
उद्यानात हिंदू, मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, पारशी धर्मीयांचे प्रतिक असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. सर्व धर्मातील नागरिक एकाच छताखाली येऊन विविध समाजाची माहिती घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या धर्मात ज्या वृक्षाला महत्व आहे. त्या वृक्ष त्या परिसरात लावले आहेत. 

ऑक्सिजन पार्क 
ज्या वृक्षांव्दारे ऑक्सीजन मिळतो. त्या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करुन बाबुंच्या झाडांमध्ये ऑक्सीजन पार्क तयार केला जात आहे. या पार्कमध्ये येण ऱ्यांना बसण्यासाठी जागा केल्या जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...