आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारी चिकन मातीच्या दिव्यांनी घेतला भूमिपुत्रांच्या दिव्यांचा ‘घास’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- दिवाळी हा दिव्यांचा सण. घरादारांत दिव्यांची आरास पेटवून सारा परिसर लख्ख प्रकाशाने उजळवण्याचा आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देणारा दीपोत्सव. दिवाळसणात मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या आधी महिना-दीड महिना कुंभार दिवे तयार करायला लागायचे. मात्र, या बाजारपेठेत चिनी वस्तूंनी घुसखोरी केल्यामुळे देशी वस्तूंना कुणी विचारेनासे झाले. त्यामुळे कुंभारवाड्यातील कुंभारांचा रोजगार हिरावला गेला आहे. 

अद्यापही मागणी, पण तुटपुंजी 
अद्यापही काही लोकांकडून आग्रहाने कुंभारवाड्यातील दिव्यांचीच मागणी केली जाते. जी काही तुटपुंजी मागणी होते, त्याप्रमाणे पुरवठा करण्यासाठी कुंभार दिवे तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. 
 

ओबडधोबडपणामुळे मागणी घटली 
औरंगाबादच्याबाजारपेठेत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बिहारी चिकन मातीच्या दिव्यांची आवक वाढली आहे. हे दिवे दिसायला आकर्षक आणि हाताळायलाही सोयीस्कर असल्यामुळे या दिव्यांना मोठी मागणी वाढली. त्यामुळे बेगमपुरा परिसरातील कुंभारवाड्यातील कुंभारांनी तयार केलेले मातीचे दिवे त्या तुलनेत ओबडधोबड असल्यामुळे त्यांची मागणी घटली आणि या कुंभारांच्या दीपोत्सवावर अंधाराचे सावट पसरले आहे. 
बातम्या आणखी आहेत...