आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमआयसी कामांसाठी ७५० कोटींची निविदा, ३१ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेंद्रा-बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते, छोटे पूल, पाणीपुरवठा व निचरा व्यवस्था, वीजपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी बुधवारी निविदा काढण्यात आली आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडतर्फे (एआयटीएल) काढण्यात आलेल्या निविदेत या सर्व कामांसाठी ७२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम ९३० दिवसांत पूर्ण करण्याची अट निविदेत देण्यात आली आहे.
औरंगाबादनजीक विकसित होत असलेल्या दिल्ली, मुंबई कॉरिडोर (डीएमआयसी) अंतर्गत येणाऱ्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीच्या कामांसाठी निघालेली ही तिसरी निविदा आहे. सर्वप्रथम जूनमध्ये इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन तंत्रज्ञान सल्लागारांसाठी अर्ज मागवण्यात आले. त्यानंतर ३१ जुलै रोजी दोन उड्डाणपुलांसाठी निविदा काढण्यात आली. तर बुधवारी शेंद्रा -बिडकीन औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांसाठी ७२५ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारने औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड ही स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन केली आहे. शेंद्रा-बिडकीन येथील डीएमआयसीच्या विकासाची जबाबदारी आता औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडकडे (एआयटीएल) राहील. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सोयी, सुविधांसाठी लागणारे साहित्य खरेदी व बांधकामचे अधिकार एआयटीएलकडे आहेत.
आतापर्यंत तीन निविदा :
-डीएमआयसीकडून सहा जून रोजी शेंद्रा बिडकीन स्मार्ट सिटीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार शेंद्रा बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहत व स्मार्ट सिटीसाठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन तंत्रज्ञान सल्लागारांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी १७ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदत असेल.
-दुसरी निविदा ३१ जुलै रोजी दोन उड्डाणपुलांसाठी निघाली. त्यासाठी ७७.७२ लाख रुपये अंदाजित खर्च येणार आहे. हे पूल ५१५ दिवसांत अर्थात साडेसतरा महिन्यांत बांधण्याची अट आहे.

-तिसरी निविदा आठ ऑगस्ट रोजी पायाभूत सुविधांसाठी काढण्यात आली. आर्थिकदृष्टीने आतापर्यंतची ही सर्वात मोठी निविदा आहे.
आतापर्यंत तीन निविदा :
- डीएमआयसी विकास महामंडळाकडून (डीएमआयसीडीसी) सहा जून रोजी शेंद्रा बिडकीन स्मार्ट सिटीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार शेंद्रा बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहत व स्मार्ट सिटीसाठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन तंत्रज्ञान सल्लागारांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी १७ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- दुसरी निविदा ३१ जुलै रोजी दोन उड्डाणपुलांसाठी निघाली. त्यासाठी ७७.७२ लाख रुपये अंदाजित खर्च येणार आहे. हे पूल ५१५ दिवसांत अर्थात साडेसतरा महिन्यांत बांधण्याची अट आहे.
- तिसरी निविदा आठ ऑगस्ट रोजी पायाभूत सुविधांसाठी काढण्यात आली. आर्थिकदृष्टीने आतापर्यंतची ही सर्वात मोठी निविदा आहे.
ही कामे होणार
-या निविदेनुसार शेंद्रा -बिडकीन औद्योगिक वसाहतीत रस्ते, भूमिगत गटारे, भूमिगत वीजवाहिन्या, पाणी निचरा व्यवस्था, गटारी व छोटे पूल यांची बांधणी व डिझाईन होणार आहे. याशिवाय या औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा व्यवस्थेचे बांधकाम केले
जाणार आहे.
- यासाठी ७२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे काम ९३० दिवसांत पूर्ण करण्याची अट आहे.
बातम्या आणखी आहेत...