आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहन करू नका, नाही म्हणायला शिका, कायद्यांचा वापर करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुरुषांप्रमाणेच महिलांनाही कामाच्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते. अशा वेळी कोणी आपला गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आले तर कानाडोळा करू नका, अवास्तव अपेक्षांना नाही म्हणायला शिका. कायद्यांचा वापर करायला शिका, असा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या प्रा.डॉ. स्मिता सोनवणे यांनी महिलांना दिला.
 
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि निवारण अधिनियम २०१३ ची माहिती देण्यासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले होते, यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, स. भु. विज्ञान महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सीव्ही रमण हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या आणि स.भु. विज्ञानच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा.डॉ.क्षमा खोब्रागडे होत्या.
 
 प्रा.डॉ.अस्मिता दसपुते, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सदस्य प्रा.डॉ.सुषमा वैद्य आणि प्रा.डॉ.प्रमोद ढाकणे यांची विशेष उपस्थिती होती. प्रा. सोनवणे म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे शोषण पूर्वीपासून सुरू होते. मात्र, २०१३ च्या कायद्यामुळे महिलांच्या हाती शस्त्र आले. याचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. 
 
वेगवेगळ्या पातळ्यांवर जबाबदारी पेलताना महिलांचा गैरफायदा घेणारे तयारच असतात. अशा वेळी शांत बसले तर गुन्हा करणाऱ्याचे फावते. समोरील व्यक्ती गैरवर्तन करतोय, हे लक्षात येताच कायद्याचा आधार घ्या. त्याची तक्रार करा. अन्य व्यक्तीही पीडितेच्या बाजूने तक्रार दाखल करू शकतो, तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाते. माहितीच्या अधिकारातही ही माहिती दिली जात नाही, असेही प्रा. सोनवणे म्हणाल्या. डाॅ. खोब्रागडे म्हणाल्या, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात या कायद्याअंतर्गत तुरळक तक्रारी दाखल झाल्या, ही चांगली बाब आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...