आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याने तोडले 25 जणांचे लचके, 13 जखमींवर घाटीत उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपुरातील जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. - Divya Marathi
पंढरपुरातील जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
वाळूज - छोट्या पंढरपुरात पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला. दिसेल त्याला चावा घेत २५ जणांचे लचके तोडले. जखमींमध्ये तीन बालकांचा समावेश आहे. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत ठार केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 
पंढरपुरातील जुन्या रांजणगाव शेणपुुंजी मार्गालगत फुलेनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे तासभर धुमाकूळ घातला. समाेर दिसेल त्याला चावा घेतला. किराणा दुकानात सामान घेणाऱ्या ग्राहकांवरही त्याने हल्ला केला होता, असे प्रत्यक्षदर्शी सुनील जाधव यांनी सांगितले. त्यामुळे अनेक जण भयभीत झाले होते. कुत्रा पिसाळलेला असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याचा पाठलाग करून लाठ्याकाठ्यांनी ठेचून ठार केले. कुत्रा चावल्यामुळे जखमी झालेल्यांना अरुण कोळसे यांनी तातडीने घाटीत दाखल केले. त्यांच्यावर वाॅर्ड क्रमांक मध्ये उपचार सुरू आहेत. 
जखमींचीनावे अशी : सागरमनोहर भोपळे, वैष्णवी सोमनाथ भोपळे, दत्तात्रेेय नवगिरे, रेश्मा पांचाळ, महेश कर्डिले, ख्वाजा सय्यद, समीर शेख, विमलबाई त्र्यंबक पाटील, कमल सुदाम सपकाळ, सखुबाई रामभाऊ भाेपळे, गजानन आमले यांच्यावर घाटीत, तर इतर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. दरम्यान , पंढरपूर भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पथकाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...